आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाताच्या स्ट्रॅन्ड रोड भागामध्ये सोमवारी रात्री एका मल्टीस्टोअर बिल्डिंगच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी घटनास्थळी 15 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या. या घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये 4 फायर फायटर, दोन पोलीस कर्मचारी आणि एक ASI यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागण्यापूर्वी इमारतीमध्ये मोठा आवाज झाला होता.
घटनास्थळावर पोहोचलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या घटनेवर मी राजकारण करत नाहीये परंतु रेल्वेने रेस्क्यू करण्यासाठी बिल्डिंगचा नकाशा उपलब्ध करून दिला नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत दिली जाईल तसेच कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल असे जाहीर केले. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घटनेटवर दुःख व्यक्त केले आहे.
न्यूज एजन्सीनुसार आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
आगीचे कारण अस्पष्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलाईघाट बिल्डिंगमध्ये आग लागल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. बिल्डिंगच्या तळमजल्यावर एक ऑनलाईन टिकट बुकिंग सेंटर होते. आग लागल्यानंतर पूर्व रेल्वे झोनच्या सर्व ऑनलाईन तिकिटांची बुकिंग थांबवण्यात आली. आग विझवण्यासाठी रोडवरील ट्राफिक थांबवण्यात आली होती. बहुतांश फ्लोअर रिकामे करण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.