आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जाधीश उद्योगपतीच्या पत्नीवर रेप:मैत्रिणीच्या पतीने केला व्हिडिओ तयार, ब्लॅकमेल करून उकळले पैसे

भोपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या एका अब्जोपती बिझनेस टायकूनच्या पत्नीने आपल्या मैत्रिणीच्या पतीविरोधात भोपाळच्या श्यामला हिल्स ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने आरोप केला आहे की, मैत्रिणीच्या पतीने बलात्काराचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर पती-पत्नीने पैशांसाठी तिला ब्लॅकमेल केले.

आरोपी खासगी कंपनीत नोकरी करतो. महिलेच्या पतीच्या कंपनीचे एकूण मूल्य सुमारे 41 हजार कोटी आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गत 11 नोव्हेंबर रोजी महिलेने आरोपीविरोधात टीटीनगर पोलिस ठाण्यात मारहाण व धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. ACP नागेंद्र पटेरिया यांनी आरोपीला अद्याप अटक झाली नसल्याचे सांगितले.

FIRमध्ये आपबीती नमूद

माझे वय 38 वर्षांचे आहे. टीटीनगर भागात राहते. पती उद्योगपती आहेत. ते मुंबईत राहतात. त्यांचा मुंबईत व्यवसाय आहे. मार्च 2021 मध्ये माझी भेट एमपी नगर स्थित शपिंग मॉलमधील धर्मेंद्र मिश्रा यांच्याशी झाली. दोघांनीही एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले. आमच्यात बोलणे सुरू झाले. धर्मेंद्रने आपली पत्नी मोनिका मिश्राची भेट करून दिली. ती माझी मैत्रीण झाली. त्यातच धर्मेंद्र मला म्हणाला - तू मला आवडतेस.

एप्रिल 2021 मध्ये धर्मेंद्रने आपल्या वाढदिवसासाठी मला घरी बोलावले. घरात मोनिकाही होती. मोनिकाने आमच्या दोघांच्या नात्याविषयी विचारले. त्यावर मी धर्मेंद्रला आपल्या मैत्रीची माहिती मोनिकाला का दिली? असे विचारले. त्यावर तो म्हणाला - आमच्यात सर्व चालते. असे होतच राहते. त्यानंतर मी व्हाइट हाउस लॉन, श्यामला हिल्समध्ये रूम घेऊन राहू लागले. धर्मेंद्र मला भेटण्यासाठी हॉटेलवर आला. तिथे त्याने माझ्यावर बलात्कार केला.

त्याने त्याचा व्हिडिओही तयार केला. त्यानंतर पत्नीसोबत मिळून मला पैशांसाठी ब्लॅकमेल करू लागला. विरोध केल्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकीही देऊ लागला. मी त्याच्या पत्नीच्या खात्यात काही पैसेही टाकले. हळूहळू मागणी वाढू लागली. विरोध केल्यामुळे मुलांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे मी शांत राहिले. पण त्रास वाढल्यानंतर गुरुवारी श्यामला हिल्स ठाण्यात गुन्हा दाखल केला.

(पीडित महिलेने पोलिसांना सांगितले तसे)

11 नोव्हेंबरला टीटी नगर ठाण्यात गुन्हा दाखल

उद्योगपतीच्या पत्नीने 11 नोव्हेंबर रोजी टीटी नगर ठाण्यात धर्मेंद्र मिश्राविरोधात मारहाण व धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार, 3 नोव्हेंबर रोजी मी घरी एकटी होते. सकाळचे साडे 9 वाजले असतील. मी मुलांना शाळेत सोडण्याची तयारी करत होते. तेव्हा धर्मेंद्र मिश्रा उर्फ धरम माझ्या घरी आला. तो ओरडू लागला -मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्याशी लग्न कर...

मी म्हणाले - तू येथे का आलास, निघून जा. त्यावर तो शिवीगाळ करू लागला. मी त्याला शांत होण्यास सांगितले. पण तो मारहाण करू लागला. त्याने आपल्यासोबत आणलेल्या क्रिकेट बॅटने माझ्या गुडघ्यावर हल्ला केला. त्यामुळे माझा पाय मोडला. मी कोसळले. त्यानंतर त्याने माझी पाठ, हात व गालावर मारहाण केली. माझ्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या. पोलिसांनी धर्मेंद्र विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेला 11 वर्षे, 5 वर्षे व 4 वर्षांचा मुलगा आहे.

व्हील चेयरवर ठाण्यात पोहोचली पीडित

मारहाणीत जखमी झालेल्या महिलेला अजून चालता येत नाही. ती शुक्रवारी व्हीलचेयरवर श्यामला हिल्स ठाण्यात पोहोचली. महिला पोलिस तिला मेडिकलसाठी घेऊन गेली. पीडितेने दिव्य मराठीला सांगितले की, आरोपीने तिच्यावर फार अत्याचार केला. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याच्या मारहाणीमुळे मला चालताही येत नाही.

गत महिन्यात पतीवरही मारहाणीचा आरोप केला होता

पीडित महिलेने आपल्या पतीवरही मारहाणीचाी आरोप केला होता. गत महिन्यातच तिने एक व्हिडिओ जारी करून आपल्या पतीवर निर्दयीपणे मारहाण केल्याचा आरोप केला होता. व्हिडिओत ती म्हणाली होती...

पतीला वेगवेगळ्या मुलींशी लग्न करण्याची आवड आहे. जेव्हा तिसरा मुलगा पोटात होता, तेव्हा त्याने फरनाज नामक मुलीशी लग्न केल्याचे कळले. माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट आहे. मी ते सेंड करेल. तो प्रत्येकवेळी अशीच मारहाण करतो. माझ्याकडे त्याचे पुरावेही आहेत. कोविडच्या काळात त्याने मला रेड पडणार असल्याचे सांगितले होते. असे सांगून तो मला व माझ्या मुलांना घराबाहेर पळवून लावत होता.

आता त्याने एका पोर्न अभिनेत्रीशी लग्न केले आहे. या अभिनेत्रीने ट्रिपल एक्स-1 (वेब सीरीज) मध्ये काम केले आहे. सोशल मडिया अकाउंट हॅक करण्यात आलेत. माझी गाडी, मुले सर्वकाही घेऊन पळून गेला आहे. आता तक्रार केली तर भावांना आत टाकण्याची धमकी देत आहे.

पीडित महिलेच्या पतीच्या 11 देशांत कंपन्या

महिलेचा पती एका कंपनीचा संस्थापक व अध्यक्ष आहे. कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. ही कंपनी ग्रुप बँकिंग, रियल्टी, हॉस्पिटॅलिटी, मायनिंग, फॉर्मास्युटिकल्स, चित्रपट निर्मिती, आयटी, लॉजिस्टिक, रिटेल, रिफायनरी, इन्फ्रास्ट्रक्चर, एअरलाइन्स, ऑटोमोबाइल, शिपिंग, फोर्स, डिफेन्स सेक्टरमध्ये काम करते.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, या कंपनीचे एकूण मूल्य 41 हजार कोटींच्या आसपास आहे. ही कंपनी तब्बल 11 देशांत काम करते. त्यांच्या कंपनीने जेट खरेदी करण्यासाठीही बोली लावली होती. पण त्यात त्यांना अपयश आले होते. कंपनी आर्म्स, सुखोई-30 व एमआय विमानांचीही किरकोळ विक्री करते. या कंपनीची न्यूज मीडियातही गुंतवणूक आहे. पतीने अनेक महागड्या चित्रपटांत गुंतवणूक केली आहे.

महिलेच्या पतीने कोरोना काळात 26 हजार नोकऱ्या देण्याचा दावा केला होता. त्याचा टाइम्स पॉवर मॅन व यंग आयकॉनिक एंटरप्रेन्योर अवॉर्ड्स-2020नेही सन्मान झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...