आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मदात्या बापाकडूनच लैंगिक छळ:बोभाटा होण्याच्या भीतीने रुग्णालयात मुलीला ठार करण्याचा प्रयत्न, हॉस्पिटल स्टाफमुळे वाचले प्राण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याच पोटच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ आणि तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका 44 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. तीला ठार मारण्यासाठी आरोपी रुग्णालयात चाकू घेऊन आला होता. पण, डॉक्टर वेळेवर पोहचल्याने मुलीचा जीव वाचला आहे. चेंबूर येथील आरसीएफ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी अटकेची पुष्टी केली. हे पॉक्सो प्रकरण असल्याचे सांगून त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये वॉर्ड अटेंडंट म्हणून काम करणारे वडील काही दिवसांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते. मी झोपल्यानंतर वडील मला अयोग्यरित्या स्पर्श करतात, असे तिने अलीकडेच आपल्या आईला सांगितले होते. या संपुर्ण प्रकरणामुळे ती मानसिक तणावात होती. तणावात तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या. यामुळे तीला सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आणि त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत आणि प्राणघातक हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पीडितेची ओळख ही तिच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी उघड केलेली नाही.

शिक्षिकेचा विनयभंग:आरोपीविरोधात गुन्हा

नई जिंदगी परिसरातील एका शाळेत मुख्याध्यापकासमाेरच एका शिक्षिकेचा विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शिक्षक संताेष महाबने याच्याविराेधात एमअायडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे. महाबने याने शिक्षकांना चाेर संबाेधले हाेते. याबाबत शिक्षकांनी त्यांच्याकडे तक्रार केली. गुरुवारी सर्व शिक्षकांची त्यांनी बैठक बाेलावली. त्याला महाबने हेही उपस्थित हाेते. तक्रारी सुरू असताना त्या शिक्षिकेने टाेमणे मारत असल्याचे सांगितले. त्यावर भडकून महाबने याने या बैठकीतच शिक्षिकेेचा विनयभंग केल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...