आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mumbai Lockdown; UP Varanasi Migrant Workers LTT Station Update | Narendra Modi Sansadiya Kshetra Workers On Train Ticketing Black Marketing

मुंबईहून परतलेल्या मजुरांची आपबीती:रेल्वेत टॉयलेटजवळ जेवण करत आहेत, गेटवर लटकून तासंतास करावा लागतोय प्रवास

वाराणसी9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत लॉक होण्यापेक्षा घरी गेलेले चांगले

रास्ते खत्म कहां होते हैं... जिंदगी के सफर में, मंजिल तो वहां है...जहां ख्वाहिशें थम जाएं...

मुंबईहून परतत असलेल्या लोकांची कहाणीही अशीच आहे. रोजी रोटी देणाऱ्या शहरांना सोडून ते घरी पोहोचले, मात्र स्वप्न पूर्ण करण्याचा रस्ता कसा मिळेल? पलायन एक्सप्रेसच्या दुसऱ्या पार्टमध्ये आम्ही मुंबईहून बनारस, लखनऊ आणि पाटणा येथे पोहोचलेल्या ट्रेनच्या बोग्यांमध्ये दाखल झालो.

हे आम्ही दोन भागांमध्ये विभागले आहे. पहिला रिपोर्ट मुंबई ते पंतप्रधान मोदींच्या आशेचे शहर बनारसमध्ये पोहोचलेल्या लोकांवर आहे. दुसरा रिपोर्ट लखनऊ आणि पाटणा येथून असेल, जेथे हजारोच्या संख्येत रोज लोक येत आहेत.

तर आज बनारसहून रिपोर्ट...
मुंबईमध्ये कोरोनाच्या प्रकरणामध्ये 20 दिवसांमध्ये 3670% वाढ झाली आहे. परिस्थिती खूप गंभीर आहे. यूपी-बिहारचे लोक परतत आहेत. मुंबईहून येणाऱ्या दोन मुख्य ट्रेन महानगरी आणि स्पेशल ट्रेन लोकमान्य टिळक 01061वाराणसी कँट रेल्वे स्टेशनवर आली आहे. 1500 ते 1600 प्रवाशांची क्षमता असणाऱ्या या ट्रेनमध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त लोक प्रवास करत आहेत.

यामध्ये एवढी गर्दी आहे की, लोकांना टॉयलेट जवळ बसून प्रवास करावा लागत आहे. खाणे-पिणे सर्व तिथेच होत आहे. अमित कुमार बिहार येथे राहणार आहेत. मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये सुपरवाजर म्हणून काम करत होते. लॉकडाऊन लागले तर कंपनीच्या सेठने म्हटले की, घरी जा.

अमित सांगू लागले की, स्टेशनवर ट्रेन पकडण्यासाठी आलो तर तिकीट मिळाले नाही. सोबतच कुटुंबातील चार लोकही होते. अशा वेळी घरी जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीवर दोन-दोन हजार फाइन भरावा लागला. म्हणजेच एकूण 8 हजार रुपये दिले तेव्हा ट्रेनमध्ये जागा मिळाली.

मुंबईत लॉक होण्यापेक्षा घरी गेलेले चांगले

काही अंतरावर दरभंगा येथे राहणारे गफ्फार बसलेले आढळले. वेल्डिंगचे काम ते करतात. त्यांचीही तीच कहाणी आहे. त्यांनी सांगितले की मुंबई स्टेशनवर तिकिटे उपलब्ध नाहीत. यायचे होते म्हणून ट्रेनमध्ये येऊन बसलो. टीटी आल्यावर त्याने प्रत्येकाला फाइन करण्यास सुरवात केली. भुसावळमध्ये 1900 रुपये दंड भरून मी प्रवास करू शकलो. कसे तरी गावात परत यायचे आहे. मुंबईमध्ये तर परिस्थिती अजिबात बरोबर नाही.

अशीच कहानी बक्सर येथे राहणाऱ्या श्याम राय यांची आहे. ते मुंबईमध्ये टॅक्सी चालवत होते. त्यांनी सांगितले की, मुंबईमध्ये मंदिर, पार्क, दुकाने सर्व काही बंद होत आहे. मग अशावेळी कोण बाहेर निघणार? कसेही बाहेर पडलो तर पोलिस मारत आहेत. मग धंदा कसा होईल? लोक त्रस्त होऊन आपापल्या गावी पळत आहेत.

शहरातील बॅग शिवण्याचा व्यवसाय करणारे मोतीहारी येथील तबरेजही घरी परतत आहेत. त्यांचा व्यवसाय गेल्या एक महिन्यापासून बंद आहे. ते काम शोधण्यासाठी गेले असता पोलिसांकडून मारहाण केली जात आहे. अनेक अडचणींनंतर हे कुटुंब ट्रेनमध्ये टॉयलेटजवळ बसून प्रवास करत आहे.

लखनऊचे ADRM आरपी चतुर्वेदी यांनी सांगितले की, दोन्ही ट्रेन महानगरी आणि स्पेशल लोकमान्य टिळक कँटवर येत आहेत. मात्र मुंबईहून परतणाऱ्यांच्या संख्येवर काहीच बोलले जाऊ शकत नाही. ट्रेन पुढे जाणार की नाही सध्या याचा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...