आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mumbai Parking Issue; Bombay High Court To State Government And Navi Municipal Corporation

पार्किंगच्या समस्येवर मुंबई हायकोर्ट कठोर:कोर्टाने म्हटले - एका फ्लॅटला का दिली जाते 4-5 गाड्या खरेदी करण्याची मंजूरी, सरकारने कठोर नियम बनवावे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टॅक्स पेयर्सचे पैसे जात आहेत वाया

मुंबई आणि त्याला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये पार्किंग समस्या सोडवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसी आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या भागांमध्ये, रस्त्याच्या जवळपास 40 टक्के जागा दोन्ही बाजूंनी कार पार्किंगमुळे कमी झाली आहे, ज्यामुळे सामान्य लोकांना रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे.

सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान प्रश्न उपस्थित केला की, एकच कुटुंब, ज्यांचा फक्त एकच फ्लॅट आहे, त्यांना चार ते पाच वाहने ठेवण्याची परवानगी का आहे? पार्किंगसाठी जागा असेल तरच नवीन वाहन खरेदी करण्यास परवानगी द्यावी, असे खंडपीठाने म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर गुरुवारी न्यायालय सुनावणी करत होते.

जनहित याचिकेचे मुख्य मुद्दे
सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदा पार्किंगचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. बिल्डर्स बहुमजली इमारतींमध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था करत नाहीत, ज्यामुळे त्याचे रहिवासी सोसायट्यांच्या बाहेर रस्त्यावर गाड्या पार्क करतात. सुनावणीदरम्यान खंडपीठाने म्हटले की, प्रशासनाकडून या विषयावर योग्य पावले उचलली गेली नाहीत, तर पार्किंगवर नियंत्रण ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

टॅक्स पेयर्सचे पैसे जात आहेत वाया
खंडपीठाने म्हटले की, 'मंत्रालय ते सहकार रोडपर्यंत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत, ते कारच्या पार्किंगसाठी आहे का? त्या रस्त्यावर पूर्णपणे गाड्या उभ्या आहेत. करदात्याचे पैसे असे का वाया घालवायचे? '

खंडपीठाने म्हटले आहे की, अधिकाऱ्यांनी आपले डोके लावण्याची गरज आहे आणि काही तरी ठोस योजना आखण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...