आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Mumbai Police Commissioner Parambir Singh Harassed Me While In Custody, Alleges BJP MP Pragya Thakur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप खासदाराचा आरोप:मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी कोठडीत असताना मला त्रास दिला, भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आरोप

भोपाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी अभिनेत्री कंगना रनोटचे समर्थन केले आहे.

मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी कोठडीत असताना मला त्रास दिला असल्याचा आरोप भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी केला आहे. तसेच त्यांनी अभिनेत्री कंगना रनोटचे समर्थन केले आहे. तसेच कंगना काँग्रेसद्वारे पीडित असल्याचाही आरोप केला.

प्रज्ञा ठाकूर आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी कंगनाच्या बचावावर भाष्य केले आहे. तसेच काँग्रेस पुरस्कृत राजकीय प्रतिशोधातून कंगनाचे मुंबईतील कार्यालय तोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबईत कंगना विरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन पोलिस आयुक्त परमबीर सिंहांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या की, 'मला माहिती आहे परमबीर सिंह कसे आहेत. तेव्हा ते वरिष्ठ पोलिस अधिकारी होते आणि आता ते मुंबईचे पोलिस आयुक्त आहेत. त्यांनी मलाही कोठडीत असताना खूप त्रास दिला आहे. मी म्हणू शकते की, त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे खोटे नसू शकतात.'

प्रज्ञा ठाकूर यांनी यापूर्वीही अनेक वेळा मुंबई पोलिसांवर भाष्य केले आहे. यापूर्वी त्यांनी अशोकचक्र विजेते शहीद हेमंत करकरे यांच्याविषयीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'महाराष्ट्रात कंगनाविरोधात करण्यात आलेली कारवाई ही काँग्रेसच्या इशाऱ्यावर करण्यात आली होती. हे सरकार होम पोर्टफोलियो ठेवते. यामुळे हे सरकार महिलांचा अपमान करत आहे.' असा आरोप प्रज्ञा ठाकूर यांनी केला आहे. तसेच त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रशंसा केली आणि म्हटले की, माझ्या संघर्षाच्या वेळी त्यांनी मला खूप मदत केली होती'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser