आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mumbai Pune (Maharashtra) Coronavirus Cases 05 May Update | Maharashtra Corona Outbreak Cases District Wise Today News; Mumbai Pune Thane Aurangabad Nashik Aurangabad Amravati

जगात सर्वात जास्त नवे रुग्ण महाराष्ट्रात:गेल्या 24 तासांमध्ये आढळले 56 हजार 647 कोरोना पॉझिटिव्ह; आता यूपी, पश्चिम बंगालमधून येथे येणाऱ्यांसाठी निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट अनिवार्य

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूपी- पश्चिम बंगालमधून येणाऱ्यांना निगेटिव्ह रिपोर्ट आणणे आवश्यक

राज्यात गेल्या 24 तासांदरम्यान कोरोनाचे 56 हजार 647 नवीन रुग्ण आढळले आहेत. जे संपूर्ण जगात सर्वात जास्त आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेत 30 हजार 701 आणि ब्राझीलमध्ये 28 हजार 935 केस आढळले आहेत. रविवारी राज्यात 669 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खरेतर ही संख्या शनिवारच्या तुलनेत कमी आहे. या दिवशी येथे 802 लोकांचा मृत्यू झाला होता. या दरम्यान राज्यात 51 हजार 356 लोक कोरोनावर मात करुन घरी परतले.

राज्यात एकूण संक्रमितांची संख्या 47 हजारांच्या पार पोहोचली आहे. यामधून 6 लाख 68 हजार 353 अॅक्टिव्ह पेशेंट्स आहेत. महाराष्ट्रात एकूण मृतांचा आकडा 70 हजार पार करत 70,284 वर पोहोचला आहे. एकूण मृतांच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र जगाच्या 209 देशांपेक्षा पुढे आहे.

यूपी- पश्चिम बंगालमधून येणाऱ्यांना निगेटिव्ह रिपोर्ट आणणे आवश्यक
उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालहून ट्रेनच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी आता कोरोनाची RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आणणे अनिवार्य असेल. हा रिपोर्ट 48 तासांच्या आतला असायला हवा. सरकारने 'ब्रेक द चेन' नुसार या संबंधी रविवारी आदेश जारी केले आहेत. यापूर्वी सरकारने गुजरात, राजस्थान, केरळ, गोवा आणि दिल्ली-NCR येथून येणाऱ्यांसाठी ही टेस्ट करणे अनिवार्य केले होते.

महाराष्ट्रात संपूर्ण आठवडा उघडणार मीटच्या दुकान
राज्यात चिकन, मटन आणि इतर खाद्य पदार्थांच्या दुकाना सातही दिवस उघड्या ठेवल्या जाऊ शकतील. या दुकानांवर नागरिक सकाळी 7 वाजेपासून दुपारी 11 वाजेपर्यंत खरेदी करु शकतील. या वेळेनंतर जर दुकान उघडे दिसले तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. दुकानदार ई-कॉमर्स सेवेच्या माध्यमातून होम डिलीवरी करु शकतील. चिकन, मटन आणि कोंबड्यांच्या वाहतूकीवर कोणतेही प्रतिबंध नाही.

बातम्या आणखी आहेत...