आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये विक्रमी 920 लोकांचा मृत्यू झाला. एका दिवसात होणाऱ्या मृत्यूचा हा आकडा कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहे. हा आकडा यासाठीही घाबरवणारा आहे कारण महाराष्ट्र जगातील दुसरे असे ठिकाणी बनले आहे, जेथे एका दिवसात सर्वात जास्त मृत्यू होत आहे. महाराष्ट्रापेक्षा जास्त 2345 मृत्यू ब्राझीलमध्ये झाले आहेत.
राज्यात 6 लाख 41 हजार अॅक्टिव्ह पेशेंट
मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाचे 5760 नवीन प्रकरणे समोर आली आणि 29 पेक्षा जास्त रुग्णांनी आपला जीव गमावला. मंगलवारी कोरोना व्हायरसचे 51,880 नवीन प्रकरणे समोर आले होते आणि 891 रुग्णांनी जीव गमावला होता. आतापर्यंत 41लाख 64 हजार 098 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 41 हजार 569 अॅक्टिव्ह पेशेंट आहेत. राज्यात सध्या रिकव्हरी रेट 85.32% आहे तर मृत्यू दर 1.49% आहे.
टेस्टिंग कमी झाल्याने रुग्णांची संख्या झाली कमी
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये नवीन रुग्णांची संख्या कमी होण्याला टेस्टिंगची संख्या कमी झाल्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे. 30 एप्रिलला येथे 2 लाख 90 हजार लोकांची टेस्टिंग झाली. या दिवशी राज्यात 62 हजार 919 नवीन रुग्ण आढळले. हा आकडा जवळपास 18% कमी होऊन 4 मे रोजी 51 हजार 880 पर्यंत पोहोचला. या दिवशी राज्यात एकूण 2 लाख 40 हजार लोकांची कोरोना टेस्ट झाली होती. गेल्या 24 तासांमध्ये पुन्हा एकदा टेस्टिंग वाढली आहे आणि संक्रमितांचा आकडा वाढून 57 हजार 640 पर्यंत पोहोचला आहे. या दरम्यान राज्यात 2 लाख 83 हजार लोकांची टेस्ट झाली आहे.
राज्यात तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी म्हणाले की, आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी गेल्या महिन्यापासून तयारी करत आहोत. ते हे देखील म्हणाले की, अनेक जिल्ह्यांमध्ये कोविड-19 प्रकरणे कमी होत असताना दिसत आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये यामध्ये वाढ होत आहेत. आम्ही यावर नजर ठेवून आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.