आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Rains Update; Maharashtra Housing MHADA Releases List Of 21 Most Dangerous Dilapidated Buildings In Mumbai; News And Live Updates

मुंबईत मृत्यूची इमारत:या जीर्ण इमारतीत राहत आहे 45 कुटुंबं, वीज-पाण्याचे कनेक्शन नाही; दुधवाले आणि पोस्टमनही भीतीपोटी येत नाही

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 वर्षांपासून या इमारतीची दुरुस्ती झालेली नाही

मुंबईत गेल्या काही दिवसापासून मान्सूनने हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईतील जीर्ण झालेल्या इमारती कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात मालाडच्या मालवणी भागात चार मजली इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर म्हाडाने शहरातील जीर्ण झालेल्या 21 इमारतींची यादी प्रसिद्ध केली होती. या इमारतीमध्ये 700 लोक राहत असून सर्वांचे आयुष्य धोक्यात आले आहेत. दरम्यान, यामध्ये चुनाभट्टी येथील टाटानगरमधील तीन मजली इमारतीचा समावेश आहे. ज्यामध्ये 45 कुटुंबांना तेथे राहण्यास भाग पडत आहे.

बीएमसीने गेल्या तीन वर्षापासून या इमारतीला धोकादायक श्रेणीत ठेवले आहे. परंतु, येथील राहणारे कुटुंबीय घर सोडण्यास तयार नाही. ही इमारत कधी कोसळले याची शास्वती नाहीये तरी देखील लोकांना येथे राहावे लागत आहे. इमारतीचा स्लॅब पूर्णपणे तुटलेला आहे. लोक दोरीच्या साहाय्याने इमारतीत जातात. सेफ्टी वॉलच्या नावाखाली फक्त लोखंडी रॉड बाकी आहे.

येथे दुधवाला, पोस्टमन येत नाही
येथील रहिवाशी महेंद्र सदाशिव कांबळे म्हणतात की, मी येथे गेल्या 65 वर्षापासून राहत असून माझे जन्मदेखील येथे झाला आहे. ही इमारत जीर्ण झाल्याने येथे दुधवाला, पोस्टमन, पेपरवाला कोणी येत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, येथे जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे. महानगर पालिकेने येथील वीजेचा पुरवठा कमी केला आहे.

कित्येक वर्षापासून कोणी पाहूणे आले नाहीत
कांबळे पुढे म्हणाले की, ही इमारत जीर्ण झाल्याने कधी जाळी तुटते तर कधी सीलिंग कोसळते. आमच्याजवळ पैसे नसल्याने आम्ही घर घेऊन बाहेर राहू शकत नाही. संबंधित प्रकरणात स्थानिक आमदारने खूप प्रयत्न केले. परंतु, त्यांनादेखील काही करता आले नाही. आम्ही दोरीच्या साहाय्याने ये-जा करतो. गेल्या कित्येक वर्षापासून येथे कोणी पाहूणे आले नसल्याचे कांबळे म्हणाले.

21 वर्षांपासून या इमारतीची दुरुस्ती झालेली नाही
या जीर्ण झालेल्या इमारतीचे बांधकाम सन 1960 मध्ये करण्यात आले होते. ही इमारत स्वदेशी सुती गिरणीने बांधली असून ही गिरणी वर्ष 2000 मध्ये बंद झाली. त्यामुळे गेल्या 21 वर्षांपासून या इमातरीची दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. येथील रहिवाशांचे म्हणणे आहे की, त्यांनी अनेक वेळा या बांधकामाची मागणी केली आहे, पण यासंदर्भात बीएमसीकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. येथे आता 100 हून अधिक लोक राहत आहेत. त्यापैकी बरीच संख्या महिला आणि मुले आहेत.

बातम्या आणखी आहेत...