आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई विमानतळाच्या टर्मिनल-2 वर सिस्टम क्रॅश झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, विमानतळावर CITA स स्टम डाउन झाले आहे. विमातळावरील सर्व कामे CITA मधूनच होतात. यावरून विमातळाचे सर्व्हर सुरळीत चालते. यंत्रणा बिघडल्याने हवाई सेवा ठप्प झाली आहे. त्याचवेळी, प्रवाशी त्यांच्या तपासणीसाठी लांब रागेंत उभे राहावे लागले. दरम्यान, विमानतळ प्राधिकरणाकडून सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर ही सेवा सुरळीत करण्यात आली.
तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी प्रशासन कार्यरत
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गेल्या अर्धा तासापासून चेक इन करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. नियोजित उड्डाणे बुक झाल्यावर विमानतळावर चेक-इन करिता प्रवाशांची गर्दी होते. अशावेळी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी विमानतळ प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. लवकरच ही सेवा पूर्ववत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे विमानतळ प्राधिकारणाकडून सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो व्हायरल
अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर याबाबत तक्रारी केल्या आहेत. व्हिडिओ व्हायरल करून विमातळावरील परिस्थिती सांगत आहेत. त्यामुळे प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी देखील अशीच समस्या उद्भवली होती, असे प्रवाशांकडून सांगितले जात आहे.
डीआयजी म्हणाले- गर्दीचे नियोजन केले जात आहे
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे डीआयजी श्रीकांत किशोर म्हणाले की, सर्व काउंटरवर मोठी रांग आहे. ऑप्टिक फायबर केबल खराब झाल्यामुळे सिस्टम क्रॅश झालेले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाउन असल्यामुळे गर्दी सामान्यपेक्षा थोडी जास्त आहे. गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित केले जात आहे. मॅन्युअल पास जारी केले जात असल्याने कोणताही गोंधळ नाही. दरम्यान, विस्ताराच्या प्रवक्त्याने एचटीला सांगितले की, सर्व विमान कंपन्यांवर परिणाम झाला आहे. अकासा एअरच्या प्रवक्त्याने देखील विमान सेवांवर परिणाम झाल्याची पुष्टी केली. विमानतळ ऑपरेटर या समस्येवर काम करत आहेत. “आम्ही प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार मदत करत आहोत असे प्रवक्त्यांनी सांगितले.
फोटोतून जाणून घ्या, विमातळावरील गोंधळ
मॅन्युअल मोडवर काम करू लागले कर्मचारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे डीआयजी श्रीकांत किशोर यांनी यंत्रणा बंद असल्याची पुष्टी केली आहे. विमानतळाची यंत्रणा कोलमडल्याने अनेक प्रवाशांची उड्डाणे लांबली आहेत. त्याचबरोबर विमानतळ कर्मचाऱ्यांना मॅन्युअल मोडवरच काम करावे लागत आहे.
प्रवासी म्हणाले - वीकेंड असाच सुरू झाला
विमान पकडण्यासाठी विमानतळावर पोहोचलेले प्रवासी ट्विट करून सिस्टम डाउनची माहिती शेअर करत आहेत. एका प्रवाशाने ट्विटरवर लिहिले की, ज्या क्षणी त्याने मुंबई विमानतळावर चेक-इनसाठी बॅग ठेवली तेव्हा सर्व यंत्रणा ठप्प झाली. सर्व काही होल्डवर आहे. वीकेंडची सुरुवात अशीच करत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.