आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई-अ‍ॅडव्हान्सचा निकाल:मुंबईचा शिशिर अव्वल; कटऑफ आतापर्यंतचा सर्वात कमी, 10 बोनस गुण असूनही टॉपरला 87.22 टक्के

दीपक आनंद/अनिरुद्ध शर्मा | जयपूर/नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलींमध्ये टॉपर तनिष्का काबरा - Divya Marathi
मुलींमध्ये टॉपर तनिष्का काबरा

आयआयटी प्रवेश परीक्षेचा जेईई-अ‍ॅडव्हान्सचा निकाल रविवारी जाहीर झाला. यंदा गणितामुळे निकाल कमी लागला. १० बोनस गुणांचाही फायदा झाला नाही. यामुळेच प्रथम आलेल्या मुंबईच्या आरके शिशिरला ३६० पैकी केवळ ३१४ (८७.२२%) गुण मिळू शकले. गतवर्षी टॉपर मृदुलला ९६.६६ टक्के गुण होते. या वर्षी आयआयटी दिल्ली झोनच्या मुलींमध्ये टॉपर तनिष्का काबरा २७७ (७६.९४%) गुण मिळवू शकली. तिची ऑल इंडिया रँक १६ वी राहिली. आयआयटीला पाचव्या वर्षी स्टँडर्ड कटऑफवर समाधान मानावे लागले. सामान्य श्रेणीत विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान ४.४% आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या तिन्ही विषयांमध्ये किमान १५.२८% गुण हवे हाेते. म्हणजेच किमान ५५ गुण मिळवणाऱ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. कटऑफ आेबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी ५०, एससी आणि एसटीसाठी २८ होता.

कटऑफ कमी हाेण्याची तीन कारणे 1 शिक्षण क्षमतेवर परिणाम : वर्ष २०२० आणि २०२१ हा काेराेना काळ होता तेेव्हा अभ्यास ऑनलाइन होत होता. जेईई मेन आणि एनईईटीच्या तुलनेत अॅडव्हान्समधील प्रश्न मोठे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न वाचणे व समजणे अवघड झाले. 2 ओटीबीटी : गणिताचे प्रश्न आऊट ऑफ द बॉक्स विचारांशी संबंधित होते. त्यामुळे ज्यांच्या संकल्पना अगदी स्पष्ट होत्या तेच विद्यार्थी पेपर चांगले सोडवू शकले. 3 भाैतिक व रसायनशास्त्र : या विषयांचे प्रश्न अवघड नव्हते, मात्र लांबलचक होते. ते सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना बराच वेळ लागला. त्यामुळे इतर प्रश्न साेडवणे राहून गेले.

दशकात टॉपरचा तिसरा सर्वात कमी स्कोअर 201392.22% 201492.77% 201593.05% 201686.02% 201792.62% 201893.61% 2019 93.01% 202088.88% 202196.66% 202287.22%

मुलींच्या तुलनेत मुलांची टक्केवारी जास्त, प्रक्रिया आजपासून सुरू होणार गेल्या वर्षी २९.५४% विद्यार्थी पात्र ठरले होते. या वर्षी ३.३४% कमी होऊन २६.२०% झाले. २०२० मध्ये २८.६४%, २०१९ मध्ये २३.९९% पात्र ठरले. गेल्या वर्षी ३२.३६% मुले, १९.१८% मुली पात्र ठरल्या. या वेळी त्यांची टक्केवारी अनुक्रमे २८.०४% आणि १९.३८% आहेे. या वर्षी १,५५,५३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ४०,१७२ पात्र ठरले. सोमवारपासून पसंतीक्रम व जागावाटप हाेईल. गेल्या दशकात आयआयटीच्या जागा ६८ टक्क्यांनी वाढल्या. २०१३ मध्ये ९८६७ होत्या. आता २३ आयआयटींमध्ये १६,५९२ जागा आहेत.

गुणवत्ता यादीत दक्षिण आघाडीवर आेजस दिव्यांग श्रेणीत अव्वल : ६ व्या वर्षी श्रवणशक्ती गमावलेला ओजस माहेश्वरी दिव्यांगांमध्ये अव्वल, गुणवत्ता यादीत २६ व्या स्थानी होता. तो जेईई मेनमध्ये अव्वल हाेता. एक्स्पर्ट आशिष अराेरा, जेईई एक्स्पर्ट

पहिल्या 15 क्रमांकावर मुले, मुलींमध्ये दिल्लीची तनिष्का काबरा अव्वल, निकाल 3.34% ने घसरला तनिष्का काबरा (मुलींमध्ये प्रथम) 1. आरके शिशिर (मुलांमध्ये प्रथम) 2. पोलू लक्ष्मी रेड्डी, 3. थॉमस बिजू चिरामवेलील, 4. वंगापल्ली साई सिद्धार्थ, 5. मयंक मोटवाणी 6.पोलीसेट्टी कार्तिकेय, 7. प्रतीक साहू, 8. धीरज कुरुकुंडा, 9. माेहित गांधीवाला, 10.वेत्चा ज्ञान महेश.

बातम्या आणखी आहेत...