आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारणजी करंडक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ४१ वेळचा चॅम्पियन असलेल्या मुंबईविरुद्ध एकेकाळच्या चॅम्पियन उत्तर प्रदेशची सुरुवात चांगली झाली नाही. उप्रने ४ धावांत २ गडी गमावले. प्रियम गर्ग अवघ्या ३ धावांवर बाद झाला, तर समर्थ शर्माला खातेही उघडता आले नाही. संघाने २ गडी गमावून २५ धावा केल्या. उपांत्य फेरीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत माधव कौशिक (११) आणि कर्णधार करण शर्मा (१०) खेळत आहेत. मुंबईच्या धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, बुधवारी मुंबईने ५ बाद २६० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. हार्दिक तमोरने (११५) शतक झळकावले. शम्स मुलाणी (५०) यांनी अर्धशतक झळकावले. मप्रविरुद्ध बंगालच्या शाहबाज, मनोजची १४३* धावांची भागीदारी
दुसरीकडे, बंगालच्या मनोज आणि शाहबाज यांनी मध्य प्रदेशविरुद्ध १४३* धावांची भागीदारी करून संघाची धुरा सांभाळली. मध्य प्रदेशने दोन वेळच्या चॅम्पियन बंगालविरुद्ध पहिल्या डावात ३४१ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशने ६ बाद २७१ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. संघ ३४१ धावांवर सर्वबाद झाला. हिमांशू मंत्रीने १९ चौकार आणि १ षटकार खेचत १६५ धावा केल्या. त्याने त्याच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीत प्रथमच १५०+ धावा केल्या. पुनीत दातेने ३३ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर संघाची तारांबळ उडाली. शेवटच्या तीन खेळाडूंनी ४१ चेंडूत फक्त ८ धावा केल्या. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी बंगालची पहिल्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे ५ खेळाडू ५४ धावांवर तंबूत परतले. मनोज तिवारी (८४*) याने सहाव्या गड्यासाठी शाहबाज अहमद (७२*) सोबत १४३* धावांची भागीदारी केली. कुमार कार्तिकेय व पुनीत यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.