आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकच्या कोलारचे भाजप खासदार एम मुनीस्वामी यांनी एका महिला दुकानदाराला टिकली न लावल्याच्या मुद्यावरून चांगलेच ठणकावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याचे झाले असे की, मुनीस्वामी महिला दिनाच्या निमित्ताने कोलार जिल्ह्यातील चन्नइहा मंदिरातील एका प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते तेथील एका स्टॉलवर थांबले. तिथे एक महिला कपड्यांची विक्री करत होती. तिने कपाळावर टिकली लावली नव्हती.
यामुळे खासदारांना तिळपापड झाला. त्यांनी त्या महिलेला चांगलेच ठणकावले. ते म्हणाले - ‘प्रथम कपाळावर टिकली लाव. तुझा नवरा जिवंत आहे ना? तुला कॉमन सेन्स नाही का'
काँग्रेसची टीका - ही BJP ची संस्कृती
काँग्रेसने या घटनेचा निषेध करत अशा घटनांवरून भाजपची संस्कृती दिसून येत असल्याची टीका केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार कार्ती पी चिदंबरम या व्हायरल व्हिडिओवर म्हणाले की, ‘BJP भारताचे हिंदुत्ववादी इराणमध्ये रुपांतर करण्याचा प्रयत्न करत आहे.' चिंदबरम म्हणाले - BJP च्या अयातुल्लांकडे रस्त्यावर गस्त घालणाऱ्या मॉरल पोलिसांचे स्वतःचे एक व्हर्जन असेल.
मंत्र्याने केली होती शेतकऱ्याला शिवीगाळ
कर्नाटकमध्येच एप्रिल 2021 मध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कट्टी यांनी पीडीएस भात वाटपात कपातीवर भाष्य करताना एका शेतकऱ्याला शिवीगाळ केली होती. या शेतकऱ्याने त्यांना केंद्रीय मदत येईपर्यंत आम्ही उपाशी रहावे की मरावे, असा सवाल केला होता. त्यावर मंत्री म्हणाले होते - मेलात तर चांगले होईल. यामुळेच आम्ही रेशन देणे बंद केले आहे. कृपया मला कॉल करू नका.’
महिलांच्या टिकली लावण्याविषयीच्या वादाची खालील बातमी वाचा...
भारत माता विधवा नाही, तू कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो:महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान; महिलांचा तीव्र आक्षेप
‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांचे आज एक विधान चांगलेच चर्चेत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी भारत माता विधवा नाही, त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो असे वादग्रस्त विधान त्यांनी आज केले.
संभाजी भिडे आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी एका महिला पत्रकाराने मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता, “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचे रुप आहे. भारत माता विधवा नाही”, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.