आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Murder Case Against Sonali Phogat's Two Colleagues, Injuries On Phogat's Body In Post mortem

खुनाचा गुन्हा:सोनाली फोगट यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा, शवविच्छेदनात फोगट यांच्या शरीरावर जखमा

पणजी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा भाजपच्या नेत्या सोनाली फोगट यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरात अनेक जखमा आढळून आल्या. यानंतर गोवा पोलिसांनी फोगट यांचे दोन सहकारी त्यांचे पीए सुधीर सागवान, सुखविंदर वासी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनावेळी रिंकू ढाका आणि मेहुणे अमन पुनिया रुग्णालयात उपस्थित होते. सोनाली फोगट २२ ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या होत्या तेव्हा त्यांच्यासोबत सुधीर सागवान आणि सुखविंदर वासी होते.

ड्रग्ज दिले की नाही तपासात कळेल
गोव्याचे पोलिस महासंचालक जसपालसिंग म्हणाले, मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. सोनालीचे भाऊ व मेहुण्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सोनालीला कर्लीज रेस्तराँमध्ये अमली पदार्थ देण्यात दिले की नाही? हा विषय तपासाचा आहे.सुरुवातीस एफआयआर दाखल केला नसल्याचे कुटुंबीयांकडून सांगितले.त्यावर जसपालसिंग यांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एफआयआर दाखल केल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...