आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्वाल्हेरमध्ये अवघ्या 5 रुपयांसाठी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. हा तरुण पैसे न देता गुटखा घेऊन पळून जात होता. पानटपरी चालक व त्याच्या 2 मुलांनी त्याला पकडून लोखंडी सळ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी त्याला रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच सोडून पळून गेले. ग्वाल्हेरच्या ललितपूर कॉलनीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरोपी पिता-पुत्रांना अटक केली आहे. दुखद गोष्ट म्हणजे मृत तरुणाच्या बहिणीचे मागील 11 दिवसांपूर्वीच निधन झाले होते.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, कंपू धाना क्षेत्रातील ललितपूर कॉलनीतील सुभाष उर्फ मटका उर्फ संजय शाक्य (26) याला गुटखा खाण्याचे व्यसन होते. त्याच्या कॉलनीतच करण सिंह यांची पानटपरी आहे. शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास संजयने या पानटपरीतून 5 रुपयांचा गुटखा विकत घेतला. करणने पैसे मागितल्यानंतर त्याने शिवीगाळ करून पळून गेला. यामुळे करणने आपल्या सचिन उर्फ संजय नामक मुलाला बोलावले. सचिनने लोखंडी गज घेऊन त्याच्या मागे धावला. त्यानंतर मटका उर्फ संजयला पकडून दोघांनी त्याला मरेपर्यंत बेदम मारहाण केली. तसेच रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेले.
रुग्णालयात मृत घोषित
तरुण रक्तबंबाळ स्थितीत पडल्याचे पाहून नागरिक गोळा झाले. त्यांनी त्याला जयारोग्य रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
आरोपी CCTVत गज घेऊन धावताना दिसले
घटनास्थळी लावलेल्या CCTVमध्ये आरोपी पिता-पुत्र हातात लोखंडी गज घेऊन धावताना दिसून येत आहेत. तसेच ते परत पळून जातानाही दिसून येत आहेत. पोलिसांनी हे फुटेजही आपल्या ताब्यात घेतले आहे.
आरोपींची चौकशी सुरू
सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीनंतर कंपू ठाण्याचे उप निरीक्षक अमर सिंह यांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. मृत तरुण गुटख्याची पुडी घेऊन पळून जात होता. त्यानंतर झालेल्या भांडणात ही घटना घडली, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.