आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंजाबच्या तरणतारणमधील भिखीविंड भागात शुक्रवारी सकाळी २ दुचाकीस्वारांनी शौर्यचक्र विजेते काॅम्रेड बलविंदरसिंग संधू (६०) यांची घरात घुसून हत्या केली. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञातांनी त्यांना ६ गोळ्या घातल्या. बलविंदर आणि त्यांच्या कुटुंबावर १९९० च्या दशकात २० अतिरेकी हल्ले झाले होते. वारंवार सांगूनही पोलिसांनी कुटुंबाला सुरक्षा व्यवस्था पुरवली नाही, असा आरोप त्यांचे बंधू रणजितसिंग यांनी केला आहे.
१९९० च्या दशकात दहशतवाद्यांनी आमच्या गावातील रस्त्यांवर भूसुरुंग पेरले, पोलिसांना वाहनासह उडवून देण्याचा होता कट
त्या काळात आमचे कुटुंब हिंदूंसाेबत बंधुभावाची कड घ्यायचे. यामुळे कट्टरपंथीयांचा आमच्यावर राग होता. त्यांच्या हल्ल्यांत बलविंदर अनेकदा जखमी झाले. सुरक्षेसाठी आम्ही घराच्या छतावरच बंकर तयार केले होते. कुटुंबावर सर्वात मोठा हल्ला ३० सप्टेंबर १९९० च्या रात्री झाला. ८ च्या सुमारास घरावर गोळीबार होऊ लागला. घरात मी, बलविंदर, दोघांच्या पत्नी, २ मुले व ४ नातलग होते. आम्ही चौघेही बंदुका घेऊन बंकरवरून प्रतिहल्ला चढवू लागलो. चोहोबाजूंनी गोळीबार होऊ लागला.
अतिरेकी खलिस्तान जिंदाबादचे नारे देत होते. यामुळे ते मोठ्या संख्येने असल्याचे जाणवले. मात्र आम्ही छतावर असल्याने त्यांचा डाव शिजला नाही. अतिरेक्यांनी ग्रेनेड फेकले, मात्र त्यांना भिंत तोडता आली नाही. पहाटे ४ वाजेपर्यंत चकमक चालली. उजाडताच अतिरेकी पळून गेले. २०० अतिरेक्यांनी गावाला घेरल्याचे सकाळी गावकऱ्यांनी सांगितले. अतिरेक्यांनी रस्त्यांवर भूसुुरुंग पेरले होते. जेणेकरून पोलिस येतील तेव्हा वाहनासह त्यांच्या चिंधड्या उडाव्यात. हल्ल्यात ३ अतिरेेक्यांचा हात होता. त्यातील एक अद्यापही फरार आहे. ३ वर्षांनी १९९३ मध्ये राष्ट्रपतींनी कुटुंबाला शौर्यचक्राने सन्मानित केले. सर्वच मोठ्या सदस्यांचा शौर्यचक्रने गौरव झालेले हे देशातील एकमेव कुटुंब आहे.’ (ज्येष्ठ बंधू रणजितसिंह यांनी दिलेली माहिती)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.