आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Murdered A Friend By Stabbing A Needle 100 Times In The Neck Latest News And Update

गळ्यात 100 वेळा सुई टोचून मित्राची हत्या:'ड्रग्ज'मुळे झाला होता वाद, 3 मित्रांनी मिळून घेतला चौथ्याचा जीव

बक्सर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या बक्सर जिल्ह्यात एका 20 वर्षी तरुणाची त्याच्याच 3 मित्रांनी हत्या केली. त्यांच्यात अंमली पदार्थांवरून वाद झाला होता. त्यानंतर तिघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्या गळ्यात ड्रग्जची सुई तब्बल 100 वेळा टोचली. यामुळे हा तरुण जागीच गतप्राण झाला.

ही घटना 9 नोव्हेंबर रोजी रात्री घडली. मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी मुफस्सिल ठाणे हद्दीतील कृतपुरा चिमणीजवळ आढळा. पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह मनोज यादवचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी या प्रकरणी मृताच्या 2 मित्रांना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी बंगळुरूला पळून गेला आहे. सर्वचजण इंटरचे विद्यार्थी आहेत.

एक चूक व आरोपींना बेड्या

मुफस्सिल पोलिसांच्या माहितीनुसार, मनोज यादवचा मोबाइल मृतदेहाजवळ आढळला नाही. पोलिसांनी मोबाइल क्रमांक सर्विलांसवर टाकला. त्या आधारावर मोबाइल ठेवणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. तो मनोज यादवचा मित्र निघाला. त्याची चौकशी केल्यानंतर हत्येचे कारण व कटात सहभागी इतर 2 मित्रांचे नाव समजले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मित्रालाही अटक करण्यात आली.

मनोज व त्याचे तिन्ही मित्र घरातून यज्ञ पाहण्यासाठी गेले होते.
मनोज व त्याचे तिन्ही मित्र घरातून यज्ञ पाहण्यासाठी गेले होते.

यज्ञ पाहण्यासाठी घराबाहेर गेले

9 नोव्हेंबर रोजी मनोज यादव आपले तिन्ही मित्र नयन प्रकाश दास(19), धीरज शर्मा(18) व सनी पासी(19) सोबत अहिरौलीमध्ये होणारा यज्ञ पाहण्यासाठी गेला होता. रस्त्यात त्यांनी कृतपुरा चिमणीजवळ ड्रग्ज घेतले. यावेळी जास्त डोस घेण्याच्या मुद्यावरून त्यांच्यात वाद झाला.

आरोपींनी सांगितले की, चौघांनीही प्रत्येकी 3 डोस घेतले होते. शेवटच्या डोससाठी भांडण झाले. मनोजला तो डोस हवा होता. यामुळे आमच्यात प्रथम मारहाण झाली. त्यानंतर सर्वांनी मिळून मनोजला ड्रग्जची सूई गळ्याजवळ तब्बल 100 वेळा टोचली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिस तपासातही ही गोष्ट उजेडात आली आहे.य

पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. तिसऱ्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. तिसऱ्याचा शोध सुरू आहे.

एक आरोपी माजी जि.प.सदस्याचा मुलगा, दुसरा आरटीआय कार्यकर्त्याचा

अटक करण्यात आलेले दोन्ही तरुण मुफ्फसिल ठाणे हद्दीतील चौसाचे रहिवासी आहेत. आरोपी नयन प्रकाश दास जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा मुलगा आहे. तर दुसरा आरोपी धीर शर्मा आरटीआय कार्यकर्ता जय प्रकाश शर्मा यांचा मुलगा आहे. जय प्रकाश शर्मांच्या मते, आरटीआय अंतर्गत माहिती मागितल्यामळे ठाणे अंमलदाराने जाणीवपूर्वक माझ्या मुलाला या प्रकरणात अडकवले. माझ्या मुलाचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. तिसरा आरोपी सनी पासी फरार आहे.

मुफस्सिल ठाणे अंमलदार अमित कुमार यांनी सांगितले की, तरुणाची हत्या त्याच्याच मित्रांनी केली होती. तांत्रिक टीमच्या सहकार्यामुळे मृत तरुणाचा मोबाइल त्याच्या मित्राकडे असल्याचे समजले. त्यानंतर 2 मित्रांना अटक करण्यात आली. त्यांनी चौकशीत तरुणाची हत्या केल्याची बाब कबूल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...