आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपूरमध्ये हल्ला करणारा झाकीर नाईकचा फॅन:मुर्तझाच्या लॅपटॉपमध्ये आढळले व्हिडिओ, धार्मिक पुस्तकात होता मंदिराचा नकाशा, नेपाळ-मुंबईतील संशयितांशी नियमित साधत होता संवाद

गोरखपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षेत तैनात पीएसी जवानांवर हल्ला करणाऱ्या मुर्तझाकडून सुरक्षा यंत्रणांना अनेक धक्कादायक पुरावे आढळलेत. सूत्रांच्या मते, आरोपीच्या बॅगेमधील अरबी भाषेतील एका धार्मिक पुस्तकात गोरखनाथ मंदिराचा नकाशा आढळला आहे. याशिवाय त्याच्या लॅपटॉमध्ये कट्टरपंथी झाकीर नाईक याचे अनेक व्हिडिओ मिळालेत. मुर्तझा मुंबई व नेपाळमधील अनेक संशयितांच्या संपर्कात होता. तो त्यांच्याशी चॅट करत होता. आता एटीएस त्याच्या या नेपाळ-मुंबई कनेक्शनचा धुंडाळा घेण्याचा प्रयत्न करत आहे.

एटीएस व एसटीएफचे संयुक्त पथक सोमवारी महाराजगंज व सिद्धार्थनगर जिल्ह्यात गेले होते. ते बांसी येथील 2 तरुणांचीही ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. या तरुणांनी हल्लेखोराला रविवारी सायंकाळी दुचाकीवरुन गोरखनाथ मंदिर परिसरात नेऊन सोडले होते. दुसरीकडे, आरोपी मुर्तझाला 14 दिवसांच्या न्यायिक कोठडीत पाठवण्यात आले आहे. तथापि, पोलिसांनी त्याला 7 दिवसांच्या कोठडीत घेतले आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात तो तंदुरुस्त आढळल्याने पोलिस लवकरच त्याला घटनास्थळी घेऊन जाऊ शकते.

एटीएसच्या मते, मुर्तझाला एखाद्या अतिरेकी संघटनेचा प्यादा असण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या अतिरेकी हल्ल्याचा हा सराव आहे. घटनेच्या वेळी तो ज्या प्रकारे शस्त्र हाती घेऊन रस्त्याने पळथ होता, त्यावरुन त्याच्याकडे शस्त्र किंवा बॉम्ब असता तर त्याने काय केले असते याचा अंदाज लावता येऊ शकतो. त्यावेळी तो केवळ अल्लाह हू अकबरचा नारा देत पोलिसांना आपल्याला गोळी घालण्याचे आव्हान देत होता.

मुर्तझाला पकडून चौकशीसाठी घेऊन जाताना पोलिस
मुर्तझाला पकडून चौकशीसाठी घेऊन जाताना पोलिस

दहशत पसरवण्याचा प्रयत्न

एटीएसच्या सूत्रांनी मुर्तझा मनोरुग्ण असल्याचा व त्याचा फायदा एखादी कट्टरपंथी संघटना घेत असल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शहरात हिंदू-मुस्लिमांत दंगल घडवून आणण्याचा त्यांचा डाव होता, असे ते म्हणालेत. एटीएसने मुर्तझा काही संशयितांच्या संपर्कात असल्याचाही दावा केला आहे. त्यांनी त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. आतापर्यंतच्या चौकशीत मुर्तझा नेपाळहून एकटा नव्हे तर त्याला 2 तरुण दुचाकीवर घेऊन आले होते. ते घटनेनंतर पसार झाले.

10 मार्चला खरेदी केला होता लॅपटॉपमधून

मुर्तझाचा लॅपटॉप काही दिवसांपूर्वी खराब झाला होता. त्यानंतर नवा लॅपटॉप खरेदी करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला 1 लाख रुपये दिले होते. त्यानंतर गत 10 मार्चला त्याने ऑनलाईन व्यासपीठावरुन 96 हजार रुपयांचा अॅपलचा लॅपटॉप खरेदी केला होता. याच लॅपटॉपमध्ये मिळालेल्या दस्तावेजांच्या आधारावर एटीएस पुढील तपास करत आहे. त्याच्या जुन्या लॅपटॉपमधील डेटाही रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जखमी जवानाकडून घटनेचा आढावा घेताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
जखमी जवानाकडून घटनेचा आढावा घेताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

योगींकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

योगींनी मंगळवारी या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच घटनास्थळाचाही आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी त्यांनी हल्लेखोर रस्त्यावर तब्बल 15 मिनिटे गोंधळ करत असताना पोलिस काय करत होते, असा सवाल अधिकाऱ्यांना केला. यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

गोरखनाथ मंदिर परिसरात घटनेचा आढावा घेताना योगी आदित्यनाथ
गोरखनाथ मंदिर परिसरात घटनेचा आढावा घेताना योगी आदित्यनाथ
बातम्या आणखी आहेत...