आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची रेकी करणाऱ्या संदीप केकडाला तुरुंगात बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुक्तसर कारागृहात ही घटना घडली. बंबीहा टोळीने केकडाला मारहाण केल्याचे समताच त्याला गोइंदवाल साहिबच्या तुरुंगात हलवण्यात आले. केकडा हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील कालांवाली गावचा आहे.
बंबीहा गँगने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे संदीप केकडाला मारहाण केल्याची पुष्टी केली. पण, तुरुंग प्रशासनाने अशी कोणतीच घटना घडली नसल्याचा दावा केला आहे. दोन्ही पक्षांत बाचाबाची झाली. पण, हा वाद वेळीच निकाली काढण्यात आला, असे त्यांनी म्हटले आहे.
थोड्याशा पैशांसाठी मुसेवालाची रेकी
दविंदर बंबीहा ग्रुपने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले की, संदीप केकडाची सर्वांनाच माहिती आहे. या घृणास्पद व्यक्तीने थोड्याशा पैशांसाठी सिद्धू मुसेवालाची रेकी केली होती. त्याला कोठडी संपल्यामुळे मुक्तसर जेलमध्ये पाठवण्यात आले होते. तिथे पोहोचल्यानंतर भल्ला बठिंडा व त्याच्या मित्रांनी त्याला बेदम मारहाण केली. आम्हाला त्याला ठार मारायचे होते. पण, तो वाचला. तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्याला वाचवले.
मुसेवालाच्या मारेकऱ्यांची हीच गत होणार
बंबीबा गँगने मुसेवालाची हत्या करणाऱ्यांना तुरुंगात अशीच मारझोड होणार असल्याची धमकी दिली आहे. तुरुंगात कोणत्याही मारेकऱ्याची गय केली जाणार नाही. संधी मिळाल्यास त्यांचे नुकसान केले जाईल. प्रत्येकाचा हिशोब केला जाईल, असे ही टोळी म्हणाली. बंबीहा गँगने सिद्धू मुसेवालाला लीजेंड म्हटले आहे.
केकड्याने 15 हजारांत रेकी केली
पोलिस तपासात केकड्याला मद्याच्या आहारी केल्याचे स्पष्ट झाले. त्याने मुसेवालाची रेकी केवळ 15 हजार रुपयांत केली. तो चाहता बनला आणि भाऊ व मित्रांसोबत मुसेवालाच्या घरी गेला. त्याने सिद्दूसोबत सेल्फीही काढली. त्यानंतर त्याची माहिती कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी बरार व लॉरेन्स गँगचा सचिन थापन यांना दिली. त्याने मुसेवाला थार जीपमधून येत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसात तपासात केकडाने आपल्याला मुसेवालाच्या हत्येची कल्पना नसल्याचे सांगितले.
लॉरेन्स गँगने हत्या केली
लॉरेन्स टोळीने मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. लॉरेन्स गॅगच्या गोल्डी बरारने यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. त्यानंतर आतापर्यंत पोलिसांनी 11 आरोपींना बेड्या ठोकल्या. गँगस्टर लॉरेन्सचीही या प्रकरणी चौकशी केली जात आहे. दुसरीकडे, मुसेवालाच्या हत्येनंतर बंबीहा टोळीने बदला घेण्याची धमकी दिली होती. बंबीहासह दिल्लीचा दाऊद म्हणून प्रसिद्ध असलेला गँगस्टर नीरज बवाना आणि भूपी राणा यांनीही सूड उगवण्याची धमकी दिली होती. त्यांच्यासोबत कौशल चौधरी व टिल्लू ताजपुरियासारखे गुंड आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.