आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसेवालाच्या 'रेकी'ची कहाणी:'फॅन' म्हणून 45 मिनिटे गेटबाहेर थांबला होता केकडा; चहा पिऊन सेल्फी काढून शार्प शूटर्सना दिली खबर

चंदिगड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येपूर्वी एका संशयिताने त्यांची चाहता (फॅन) बनून रेकी केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. पंजाब पोलिसांनी या प्रकरणी हरियाणाच्या सिरसा येथील कालांवाली गावातून केकडा नामक व्यक्तीला अटक केली आहे. हा व्यक्ती मुसेवाला घराबाहेर पडताना त्याच्या गेटबाहेर दिसून आला होता. पोलिसांना या व्यक्तीने हल्लेखोरांसाठी मुसेवालांची रेकी केल्याचा संशय आहे. सध्या त्याची चौकशी केली जात आहे.

प्राथमिक तपासात स्पष्ट झाले की, केकडा आपल्या सहकाऱ्यासह मुसेवालाचा चाहता बनून मूसा गावात आला होता. तो तिथे जवळपास 45 मिनिटे थांबला. त्याने चहा घेतला. त्यानंतर मुसेवालासोबत त्याने सेल्फीही घेतली. याद्वारे त्याने मुसेवालासोबत अंगरक्षक आहेत किंवा नाही याची माहिती घेतली. त्यानंतर मुसेवाला थार जीप चालवत सुरक्षेविना घराबाहेर पडल्यानंतर त्याने त्याची खबर शार्प शूटर्संना दिली.

घराबाहेर पडताना सिद्धू मुसेवालाच्या थारसोबत उभे असणारे चाहते. हत्येच्या 15 मिनिटे अगोदरचे हे फुटेज मुसेवालाच्या घराबाहेरील आहे.
घराबाहेर पडताना सिद्धू मुसेवालाच्या थारसोबत उभे असणारे चाहते. हत्येच्या 15 मिनिटे अगोदरचे हे फुटेज मुसेवालाच्या घराबाहेरील आहे.

मोकळेपणा ठरला हत्येचे कारण ठरले

सिद्धू मुसेवाला आपल्या गावात चाहत्यांची मनमोकळेपणाने भेट घेत होते. ते कुणालाही हवेलीच्या आत येऊ येत नव्हते. पण, बाहेरील एका झाडाखाली सर्वांना भेटत होते. मुसेवालाच्या घरी एखादा चाहता आला तर त्याला चहापाणी दिले जात होते. त्यानंतर मुसेवाला बाहेर येऊन त्यांच्यासोबत फोटो काढत. मुसेवालांचे हाच मोकळेपणा त्यांच्या हत्येचे मोठे कारण बनले.

CCTV दिसला आरोपी

पोलिसांना केकडाचे मुसेवालाच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजही आढळले आहे. हे फुटेज मुसेवालाच्या हत्येच्या 15 मिनिटांपूर्वीचे आहे. 29 मे रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास मुसेवालांची हत्या करण्यात आली. हे फुटेज त्यापूर्वीचे म्हणजे सायंकाळी 5.15 चे आहे. त्यात संशयित केकडा दिसून येत आहे. पण, त्याने कुणाला फोन केला किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

काम करणाऱ्यांवरही संशय

पोलिसांना मुसेवालाच्या घरी काम करणाऱ्यांवरही संशय आहे. त्यांनी पोलिसांना काही फॅन मुसेवालांना भेटण्यासाठी आल्याचे सांगितले होते. त्यातील कुणीतरी पंजाबी गायक घरातून थार जीपमधून बाहेर पडल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज खंगाळले असता, त्यात केकडाची हरकत संशयास्पद वाटली. त्यानंतर लगेच त्याला उचलण्यात आले.

अचूक रेकी करुन केली हत्या

सिद्धू मुसेवालाची हत्या अचूक रेकी करुन करण्यात आली. शार्प शूटर्सने प्रथम मुसेवालाच्या जीपचे टायर पंक्चर केले. त्यानंतर केवळ ड्रायव्हिंग सीटवरच गोळीबार करण्यात आला. त्यांना मुसेवालाच जीप चालवत असल्याचे व त्यांच्यासोबत अंगरक्षक नसल्याची अचूक माहिती होती. यामुळेच त्यावेळी जीपमध्ये असणाऱ्या गुरविंदर व गुरप्रीतचे प्राण वाचले. हे दोघेही मुसेवालाचे मित्र होते.

बातम्या आणखी आहेत...