आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Muslim Women Defamation Case | Marathi News | Mastermind Arrested For Creating Sully Deals App; Delhi Police Went To Indore And Handcuffed Him

मुस्लिम महिलांची बदनामी प्रकरण:सुल्ली डिल्स अ‍ॅप बनवणाऱ्या मास्टरमाइंडला अटक; दिल्ली पोलिसांनी इंदुरमध्ये जाऊन ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम महिलांची इंटरनेट बदनामी करणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सुल्ली अ‍ॅपची निर्मिती करणाऱ्या मास्टरमाइंडला अटक केली आहे. ओमकेश्वर ठाकुर असे अ‍ॅप तयार करणाऱ्या आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी इंदुर येथून अटक केली आहे. 25 वर्षीय आरोपी ओमकेश्वर ठाकुर याने इंदुरच्या आयपीएस अ‍ॅकॉडमीतून BCA केले आहे. गेल्या वर्षी जुलै 2021 मध्ये त्याने सुल्ली अ‍ॅपची निर्मिती केली होती.

या अ‍ॅपमध्ये मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करुन, त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू होते. याअगोदर बुल्ली बाई अ‍ॅप्सप्रकरणात दिल्ली पोलिसांनी नागोर येथून एकाला अटक केली आहे. हे दोन्ही अ‍ॅप्स मुस्लिम महिलांची बदनामी करण्याचे काम करत होते.

खासदार प्रियंका चतुर्वेदींनी उठवला होता आवाज
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी बुल्ली बाई अ‍ॅप विरोधात आवाज उठवला होता. त्यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आतापर्यंत बुल्ली बाई या अ‍ॅप प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यातील श्वेता सिंह याला मुंबई पोलिसांनी उत्तराखंड मधून अटक केली आहे.

विशाल झा ला अटक
मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे समोर आले आहे की, या अ‍ॅप्स प्रकरणात नेपाल, दिल्ली, महाराष्ट्र, बंगळुरू या राज्यासह अनेक प्रदेशांतील सुशिक्षित तरुण यात सामील असल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिस आता उर्वरित आरोपींचा तपास करत आहे. मुंबई पोलिसांनी याच प्रकरणात मयंक नावाच्या एका जणाला अटक केली आहे. पोलिसांनी विशाल झा या इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला देखील बंगळुरुतून अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...