आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वतःच्या बेजबाबदार मुलांमुळे मन दुखावलेल्या एका 80 वर्षीय वृद्धाने आपली कोट्यवधी रुपयांची संपत्ती उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या नावे केली आहे. या वृद्धाने आपल्या अंत्यसंस्कारालाही मुलांनी हजर राहू नये, अशी इच्छा आपल्या मृत्युपत्रात म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरात ही घटना घडली आहे.
मुजफ्फरनगरच्या बुढाना तालुक्यातील बिराल गावात 80 वर्षीय तत्थू सिंह यांचे कुटुंब राहते. त्यांच्या पत्नीचा 20 वर्षांपूर्वी मृत्यू झाला. नत्थू सिंह यांनी आपली दोन्ही मुले व 4 मुलींचे हात पिवळे केले. त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा मुलगा सहारनपूरमध्ये सरकारी शिक्षक आहे. 5 महिन्यांपूर्वी नत्थू सिंह यांना नाईलाजाने वृद्धाश्रमात जावे लागले. कारण, त्यांना एकवेळचे जेवणही मिळत नव्हते. मुलगा व सुनेच्या व्यवहारामुळे दुखावलेल्या नत्थू सिंह यांनी सांगितले की, ते स्वतः स्वयंपाक करून उदरनिर्वाह करत होते. यामुळे त्यांनी आपली कोट्यवधी रुपयांची जवळपास 18 बीघा जमीन राज्यपालांच्या नावे केली आहे. त्यांनी आपल्या मुलालाही संपत्तीतून बेदखल केले आहे.
'गोळ्या घातल्या तरी जमिनीचा तुकडा देणार नाही'
मुलीच्या नालायकपणामुळे दुखावलेल्या नत्थू सिंह यांनी सांगितले की, मी न्यायालयात न्यायाधीशापुढेही मला गोळ्या घाला, पण माझ्या जमिनीचा एक तुडाही मुलाला देणार नाही.
समाजापुढे सादर केले उदाहरण
80 वर्षीय नत्थू सिंह यांनी सांगितले की, मी माझ्या नालायक अपत्यांना संपत्तीतून बेदखल करून संपूर्ण जमीन राज्यपालांच्या नावे केली आहे. या माध्यमातून त्यांनी समाजाला एक संदेश दिला आहे. या घटनेतून आपल्या पालकांविषयी बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या मुलांना धडा मिळेल, असे ते म्हणालेत. काहीजण आपल्या घटनेतून योग्य ती प्रेरणा घेतील, असेही ते म्हणालेत.
मुलासह सुनेवर केले गंभीर आरोप
नत्थू सिंह म्हणाले की, अनेकदा माझ्या हत्येचा प्रयत्न झाला. मला माझ्या खोलीत गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण सुदैवाने मी बचावलो. मी माझ्या सुनेला स्वतःच्या मुलीसारखे मानत होतो. मी तिला नेहमीच बेटी म्हणून बोलावत होते. पण तिने माझ्याशी चुकीचा व्यवहार केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.