आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • My Allegation Is That Congress Got Subhash Chandra Bose Killed, Sakshi Maharaj's Serious Allegations

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त विधान:'​​​​​​​काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली', साक्षी महाराजांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका सभेला संबोधित करत असताना साक्षी महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे.

भाजपचे नेते, खासदार साक्षी महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साक्षी महाराज यांनी काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप लावला आहे. काँग्रेसनेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली असल्याचा धक्कादायक आरोप साक्षी महाराज यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एका सभेला संबोधित करत असताना साक्षी महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला. 'काँग्रेसनेच अवेळी सुभाषचंद्र बोस यांना मृत्यूच्या दाढेत ढकलेल होते. माझा आरोप आहे की, काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली आहे. हे फक्त त्यांच्या लोकप्रियतेमुळे करण्यात आले. सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेपुढे पंडित नेहरू आणि महात्मा गांधीही फिके पडत होते.' असे साक्षी महाराज म्हणाले आहेत.

शनिवारी देशभरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या दरम्यान साक्षी महाराजांनी हे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रक्त सांडवून आपण स्वातंत्र मिळवले आहे. स्वातंत्र मिळवणे सोपे नव्हते. त्यासाठी सुभाषबाबूंना तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुँगाचा नारा द्यावा लागला.

बातम्या आणखी आहेत...