आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे वळण:माझ्या पतीची काैशिक यांना मारण्याची इच्छा हाेती ; फार्महाऊस मालकाच्या पत्नीचा आराेप

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सतीश काैशिक यांच्या मृत्यूला नवे वळण मिळाले आहे. काैशिक मृत्यूपूर्वी दिल्लीच्या कापसहेडा येथील एका फार्महाऊसमध्ये हाेते. हे फार्महाऊस विकास मालूंच्या मालकीचे आहे. मालू अत्याचारातील आराेपी असून फरार आहे. मालूची पत्नी शानवी यांनी पाेलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार काैशिक फार्महाऊसमध्ये हाेळी खेळण्यासाठी नव्हे, तर माझ्या पतीकडे १५ काेटी रुपयांची मागणी करण्यासाठी आले हाेते. त्याच रात्री काैशिक यांचा मृत्यू झाला. माझा पती काैशिक यांची हत्या करू इच्छित हाेता. काैशिक गेल्या वर्षीदेखील दुबईच्या फार्महाऊसमध्ये पैशांच्या मागणीसाठी आले हाेते. तेव्हाही वाद झाला हाेता. त्यानंतर मी गप्प बसणार नाही. त्याला आैषधाचा आेव्हरडाेस दिला तर ताे तसाच मरून जाईल, असे मालूने म्हटले हाेते.

बातम्या आणखी आहेत...