आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mysore's Famous Dussehra Festival Starts Simply! More Than 1 Thousand Kinds Of Flowers In The Palace

बंगळुरू:म्हैसूरच्या प्रसिद्ध दसरा उत्सवास साधेपणाने प्रारंभ! महालात 1 हजाराहून जास्त प्रकारची फुले

बंगळुरू / विनय माधव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडमुळे यंदाही म्हैसूरचा प्रसिद्ध दसरा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. गुरुवारी त्यास प्रारंभ झाला. सकाळी चामुंडी डोंगरावरून त्याची सुरुवात झाली. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता म्हैसूर पॅलेसमध्ये गज पालखीने या उत्सवाचा समारोप होईल. वीराना होसल्ली कॅम्प, नागरहोल नॅशनल पार्कमधून आठ हत्तींचे दल १६ सप्टेंबर रोजी म्हैसूर पॅलेसला पाेहोचले होते. तेव्हापासून हे दल जम्बो सवारीसाठी सराव करत आहे. या दलाचे नेतृत्व अभिमन्यूने केले. या हत्तीवरून ८०० किलो वजनाची चामुंडेश्वरी देवीची पालखी नेण्यात आली. जिल्हा प्रभारी मंत्री एसटी सोमशेखर म्हणाले, कोरोना प्रोटोकॉल लागू करण्यात आला आहे. सोबतच दसरा उत्सवाचा ४०० हून जास्त वर्षांचा सांस्कृतिक वारसाही लक्षात घेण्यात आला आहे. म्हैसूर महालात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महालात १९ वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. जिल्हा प्रशासन म्हैसूर शहरात १०० किमी रस्ते उजळले आहेत.

शहरातील ४१ पेक्षा जास्त भाग रोषणाईने न्हाऊन निघाले आहेत. या रोषणाईवर ५ कोटींहून जास्त खर्च अपेक्षित आहे. २.५ लाख युनिट वीज खर्च होईल. महालाचे उपसंचालक टीएस सुब्रमण्यम यांच्या म्हणण्यानुसार लसीकरणाचे प्रमाणपत्रही पाहिले जातील. म्हैसूर पॅलेसवर अनेक महिन्यांपासून काम सुरू होते. रंगरंगोटी, डागडुजी, उद्यानांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या महालात एक हजार प्रकारची फुले पाहायला मिळतात.

१२ दिवसांच्या मदिकेरी दसरा उत्सवामुळे कोडागू जिल्ह्याच्या सीमा बंद
म्हैसूरजवळील कोडागू जिल्ह्यातील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. येथे १२ दिवसांचा मदिरेकी दसरा म्हैसूरनंतरचा सर्वात चर्चेतील उत्सव मानला जातो. जिल्ह्यास केरळ जवळचे राज्य आहे. केरळमध्ये अद्यापही कोरोनावर नियंत्रण नाही. दसऱ्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमणार असल्याने १७ ऑक्टोबरपर्यंत लोकांना प्रवेशास परवानगी देण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...