आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी:गूढ तापाने 10 दिवसांत 100 मृत्यू, प्रत्येक जिल्ह्यात सापडताहेत 500 रुग्ण

आग्रा / एम. रियाज हाश्मी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम उत्तर प्रदेशात १० दिवसांपासून सुरू गूढ तापाने विक्राळ रूप घेतले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत दहा जिल्ह्यात सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अर्धी मुले आहेत. गेल्या तीन दिवसांत २० जिल्ह्यांत हा संसर्ग पसरला असून प्रत्येक जिल्ह्यात सरासरी दररोज ५०० नवे रुग्ण सापडत आहेत. इनफ्लूएंझा विषाणूच्या स्वरूपात बदल झाल्याचा संशय डॉक्टरांना असला तरी त्याबाबत निष्कर्ष निघत नाही. अनेक आजारांची लक्षणे त्यात असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटाखाली हे नवे आव्हान उभे ठाकले आहे. जास्त प्रभाव असलेल्या जिल्ह्यात शाळा सुरू होण्याआधीच बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वाधिक प्रभाव फिरोजाबाद जिल्ह्यात आहे. मथुरा, कासगंज, आग्रा, एटा, मैनपुरी, नोएडा, गाझियाबाद, मुझफ्फरनगर, श्यामली तसेच सहारनपूरमध्ये आतापर्यंत तापामुळे जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ७० जणांचा मृत्यू फिरोजाबादमध्ये झाले आहेत. यात ४६ मुलांचा समावेश आहे. सर्वच प्रकरणांत तीव्र तापासोबत प्लेटलेट्सच्या संख्येत मोठी घट, डिहायड्रेशन, सांधेदुखी, खोकल्याची लक्षणे दिसली.

मथुरेत ‘स्क्रब टायफस’चे २९ रुग्ण आढळले, अलर्ट जाहीर
मथुरेत प्राथमिक चौकशीत ‘स्क्रब टायफस’ म्हटल्या जाणाऱ्या माइट जनित रिकेटिसयोसिसचे २९ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने प्रयोगशाळेच्या अहवालात याबाबतच्या पुष्टीनंतर अलर्ट जाहीर करत म्हटले की, २ ते ४५ वर्षांचे २९ रुग्ण २९ ऑगस्टला पॉझिटिव्ह आढळले होते. संक्रमित चिगर्स (लार्वा माइट्स) चावल्यानंतर ‘स्क्रब टायफस’ पसरतो.

तापाचा शोध घेण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे निर्देश
स्थिती बघता फिरोजाबादला आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डॉक्टरांना निर्देश दिले की, तत्काळ तपासणी करून हा ताप डेंग्यूचा आहे की दुसराच काही आजार आहे याचा शोध घ्या. फिरोजाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालयानंतर मुख्यमंत्री सुदामानगर येथेही गेले, सर्वाधिक लोक तेथे या आजाराने पीडित आहेत. फिरोजाबादमध्ये ६ सप्टेंबरपर्यंत शाळा बंद केल्या आहेत.
या तापामुळे मथुरेत ९ जणांचा मृत्यू, खाटांची टंचाई

फिरोजाबाद रुग्णालयात मुलाची तपासणी करताना डाॅक्टर.
मथुरेत तापाने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर कासगंजमध्ये तीन जणांचा बळी गेला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासकीय रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. फिरोजाबाद जिल्हा रुग्णालयात १०० पेक्षा जास्त मुलांवर उपचार सुरू आहेत. सहारनपूरच्या टपरी गावात ४ जणांचा मृत्यू झाला. सीएमएस डॉ. आभा वर्मा सांगतात, रोज ५०० पेक्षा जास्त रुग्ण दवाखान्यात येत आहेत. त्यात अर्धी मुले आहेत.

बातम्या आणखी आहेत...