आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्कराचा ‘नाग’:एकदा डागले की मग कुणाचेही ऐकत नाही! ‘शक्तिसाधने’ दरम्यान देशाला मिळाली 2 खास शस्त्रे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 वर्षांपर्यंत देखभालीविना वापर शक्य, 230 मीटर प्रतिसेकंदाचा वेग

सीमेवर चीनसोबत तणाव सुरू असताना भारताने गुरुवारी पहाटे ६:४५ वाजता राजस्थानच्या पोखरणमध्ये ‘नाग’ या रणगाडाभेदी गायडेड क्षेपणास्त्राची यशस्वी अंतिम चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र आता लष्करात समाविष्ट होण्यासाठी सज्ज आहे. फायर अँड फॉर्गेट श्रेणीतील या क्षेपणास्त्रात लक्ष्य निश्चित करण्यासाठी इन्फ्रारेड सीकर आहे. म्हणजे एकदा लक्ष्यावर डागले की नंतर ते बदलता येत नाही.

शत्रूचे रणगाडे, चिलखती वाहने उद्ध्वस्त करू शकते
- हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी आहे. हेलिकाॅप्टरने ५ किमी, जमिनीवरून ४ किमी मारक क्षमता आहे.
- दिवसा-रात्री हल्ल्यासाठी सक्षम.
- दीड महिन्यात डीआरडीओने १२ क्षेपणास्त्रे किंवा सिस्टिमच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत.
- कोणत्याही हवामानात एकसमान मारक क्षमता. यासाठी भारताच्या पूर्व-पश्चिम या दोन्ही सरहद्दींवर हे क्षेपणास्र तैनात केले जाऊ शकते.

नाैदलात आता आयएनएस कवरत्ती : शत्रूची पाणबुडी पूर्णपणे नष्ट करण्यात सक्षम
विशाखापट्टणम | नाैदलात गुरुवारीच पाणबुडीरोधक यंत्रणेने सुसज्ज स्वदेशी स्टील्थ युद्धनौका आयएनएस कवरत्तीचाही समावेश केला. त्यातील ९०% वस्तू स्वदेशी आहेत. आधी आयएनएस कवरत्ती जनरल क्लास क्षेपणास्त्र युद्धनौका होती. कवरत्तीने १९७१ मध्ये बांगलादेशाला पाकिस्तानी ताब्यातून स्वतंत्र करण्यासाठी झालेल्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

शत्रूची पाणबुडी शोधून तिचा अचूक पाठलाग करते
- युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रप्रणालीने सज्ज आहे. {त्यात अत्याधुनिक सेन्सर बसवले आहेत. ते पाणबुड्यांना शोधणे, त्यांचा पाठलाग करणे आणि त्या उद्ध्वस्त करण्यात सक्षम आहेत.
- सागरी सुरुंगांना शोधणे, त्यांना निष्क्रिय करण्यास ही पाणबुडी सक्षम आहे.
- अणुयुद्ध, रासायनिक, जैविक युद्धाच्या स्थितीत युद्धनौका उपयोगी आहे.