आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Swearing Ceremony Today In Nagaland Meghalaya; PM Modi Amit Shah At Ceremony | Conrad Sangma | Neiphiu Rio

नेफ्यू रिओ 5 व्यांदा नागालँडचे CM:शपथविधी सोहळ्याला PM मोदी, शहा उपस्थित; मेघालयमध्ये कॉनराड संगमांनी घेतली शपथ

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेफ्यू रिओ यांनी मंगळवारी पाचव्यांदा नालालँडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. या शपथविधीसह नागालँडमध्ये पुन्हा एकदा NDPP-BJP चे आघाडी सरकार अस्तित्वात आले आहे.

नेफ्यू रिओ यांनी शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींचे अभिवादन केले.
नेफ्यू रिओ यांनी शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींचे अभिवादन केले.

NDPP-BJP आघाडीने 60 सदस्यीय नागालँड विधानसभेतील सर्वाधिक 37 जागा जिंकल्या होत्या. त्यात NDPP ने 25 व BJP ने 12 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 7 सीट, NPF ने 5 व नागा पीपल्स फ्रंट, लोक जनशक्ती पार्टी व RPI ने प्रत्येकी 2 जागांवर विजय संपादन केला होता.

नागालँडमध्ये 85.90% व्होटिंग

नागालँडच्या 16 जिल्ह्यांतील 60 पैकी 59 विधानसभा मतदार संघांत 27 फेब्रुवारी रोजी 85.90% मतदान झाले होते. ही टक्केवारी गतवेळच्या तुलनेत 10% जास्त आहे. 2018 मध्ये येथे 75% मतदान झाले होते. गत 10 फेब्रुवारी रोजी येथील अकुलुतो विधानसभा क्षेत्रताील काँग्रेस उमेदवार खेकाशे सुमी यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. यामुळे भाजप उमेवदार कजेतो किनिमी यांचा बिनविरोध विजय झाला होता.

NDPP ची 2017 मध्ये स्थापना झाली. NDPP ने तेव्हा 18 व भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. दोन्ही पक्षांनी निवडणुकीपूर्वी आघाडी केली होती. आघाडी सरकारमध्ये NDPP, BJP, NPP व JDU चा समावेश आहे.

कॉनरॅड संगमा यांनी मंगळवारी सलग दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. दुसरीकडे, नागालँडमध्ये नेफियू रिओ दुपारी 1.45 वा. 5व्या कार्यकाळाची शपथ घेतील. यावेळीही मोदी व शहा उपस्थित राहतील.

संगमा पुन्हा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी

मेघालयमध्ये एनपीपी, यूडीपी, भाजप आणि एचएसपीडीपी यांचे युती सरकार स्थापन झाले आहे. कॉनराड संगमा यांनी मंगळवारी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी 32 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर केले होते. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि एनपीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष संगमा यांनी नव्या युती सरकारचे नाव 'मेघालय डेमोक्रेटिक अलायन्स 2.0' असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळात एनपीपीला 8 जागा, यूडीपीला 2 जागा आणि भाजप आणि एचएसपीडीपीला प्रत्येकी एक जागा दिली जाईल.

मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभेच्या 59 जागांसाठी मतदान झाले होते. 2 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये NPP 26 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. तर, यूडीपीला 11 जागा मिळाल्या. काँग्रेस आणि टीएमसीला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. तर भाजपने दोन जागा जिंकल्या.

मेघालयात 85.27% मतदान

मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला 60 पैकी 59 जागांवर मतदान झाले होते. 85.27% मतदान झाले. यूडीपी उमेदवार एचडीआर लिंगडोह यांच्या निधनामुळे सोह्योंग जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. 2018 मध्ये 67% मतदान झाले होते.

बातम्या आणखी आहेत...