आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेवर व तिच्या मुलावर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. नागपूरातील विनोबा भावेनगरात राहणाऱ्या लता यांना मंगळवारी सकाळी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला.
फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने लता यांना सांगितले की, 'तुमच्या पतीचे अफेअर सुरू आहे, तुम्ही मला भेटायला आलात, तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल'. त्यानंतर लता आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन सांगितलेल्या ठिकाणी भेटण्यासाठी निघाल्या. घरापासून काही अंतरावर लता जात नाही. तोच तिच्यावर पाठीमागून आलेल्या स्कूटीस्वारांनी अॅसिड फेकले. यात आई लता व तिच्या मुलगा किरकोळ जखमी झाला. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज, दुचाकीस्वार दोघांनी केला हल्ला
सुदैवाने हल्लेखोरांचे लक्ष्य चुकले, त्यामुळे लता आणि तिच्या मुलावर मोठ्या प्रमाणात अॅसिड पडले नाही. त्याबालंबाल बचावल्या, मात्र, यात त्यांच्या हाताला आणि पोटाला दुखापत झाली आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनी जखमी झालेल्या लता आणि तिच्या मुलाला रुग्णालयात दाखल केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यात दोन स्कूटीस्वार संबंधित महिलेवर अॅसिड फेकताना दिसत आहेत.
पती ड्रायव्हरचे काम करतो, फोन आल्याने निघाली
लतादीदींनी सांगितले- मी गृहिणी आहे आणि माझे पती पुराणिक हे व्यवसायाने ड्रायव्हर आहेत. आम्हाला एक अडीच वर्षांचा मुलगाही आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता कोणीतरी फोन करून माझ्या पतीच्या अफेअरबद्दल सांगितले. त्यामुळे मी अस्वस्थ झाले. फोन करणाऱ्याने मला कुंदनलाल गुप्तानगरला भेटायला बोलावले. त्या ठिकाणी भेट झाल्यानंतर संपूर्ण माहिती देऊ असे सांगितले.
हल्लेखोरांनी बुरखा घातलेला होता
लता यांनी सागितले की, मी अडीच वर्षांच्या मुलाला खाकेत घेऊन घराबाहेर निघाली. तेव्हा पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीस्वार दोघांनी माझ्यावर अॅसिड फेकले. हल्लेखोरांनी बुरखा घातला होता. त्यामुळे लता यांना त्यांची ओळख पटली नाही, हल्ल्यानंतर दोघेही तेथून पळाले.
पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची पोलिसांना शंका
पोलिस सूत्रांनी सांगितले की, लता यांच्या पतीचा कोणाशी तरी वाद सुरू आहे. वैमनस्यातून लता आणि त्यांच्या मुलावर हल्ला करण्यात आला. जरी याची अद्याप पुष्टी झालेली नाही. सद्या पोलिस त्यादृष्टीने तपास करित आहेत. याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पुराणिक यांच्या प्रेयसीने त्यांच्या पत्नीवर हल्ला केल्याचा दावा काही माध्यमांकडून केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.