आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीने यूट्यूबवर पाहून दिला बाळाला जन्म:लगेच ठार मारले, प्रेग्नेंसी लपवत आईला म्हणाली - आरोग्याची समस्या आहे

नागपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूरच्या अंबाझरी भागात ही घटना घडली आहे.  - Divya Marathi
नागपूरच्या अंबाझरी भागात ही घटना घडली आहे. 

नागपूरच्या अंबाझरी भागात एका गरोदर अल्पवयीन मुलीने यूट्यूबवर पाहून स्वतःची डिलीव्हरी केली. ही गोष्ट कुणाला कळू नये म्हणून तिने आपल्या नवजात बाळाचा गळा दाबून हत्या केली. 15 वर्षीय मुलीने नवजात बाळाचा मृतदेह आपल्या घरातच एका बॉक्समध्ये लपवून ठेवला.

ही घटना गत 2 मार्च रोजी घडली. पण ती रविवारी मुलीची आई घरी परतल्यानंतर उजेडात आली. मुलीच्या आईने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. आईने मुलीला रुग्णालयातही नेले. पोलिसांनी बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुलीवर हत्येचा गुन्हा दाखल केला जाईल.

सोशल मीडियावर मुलाशी झाली होती मैत्री, त्यानेच केले लैंगिक शोषण

अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले की, ज्या मुलाने तिचे लैंगिक शोषण केले, तो तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटला होता. गरोदरपणाची गोष्ट तिने कुटुंबीयांपासून लपवून ठेवली. एवढेच नाही तर तिचे वाढलेल्या पोटाविषयी आईने विचारले असता तिने ही आरोग्याची समस्या असल्याचे सांगितले.

दिव्य मराठीच्या इतर बातम्या वाचा...

महिलेच्या गर्भाशिवाय 30 हजार बालके जन्माला घालणार:काय आहे 'बेबी पॉड' आणि याद्वारे नवजात कसे जन्माला येतील?

1999 मध्ये 'मॅट्रिक्स' हा हॉलिवूड चित्रपट आला होता, ज्यामध्ये एका कारखान्यात माणसांची निर्मिती म्हणजेच पैदास केली जात असल्याचे दाखवण्यात आले होते. या चित्रपटाने जगभरातील लोकांना आश्चर्यचकित केले. पण स्त्रीच्या गर्भाशिवाय मुले निर्माण करणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का? येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...