आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Nal Se Jal' Scheme Benefits 5K Families In The Country, More Beneficiaries In Gujarat, Claims Jal Jeevan Mission Official

योजना:‘नल से जल’ याेजनेचा देशातील 5 काेटी कुटुंबांना लाभ, गुजरातेत जास्त लाभार्थी, जल जीवन मिशनच्या अधिकाऱ्याचा दावा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनद्वारे एक वर्षात ४ काेटी ९४ हजार ६३ हजार कुटुंबे जाेडली गेली आहेत. याेजनेशी संबंधित अधिकाऱ्याने हा दावा केला आहे. २०२४ पर्यंत देशातील सुमारे १८ काेटी ९३ लाख ३० हजार ८७९ घरांमध्ये नळाद्वारे पाणी पाेहाेचवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प आहे. पंतप्रधानांनी गेल्या वर्षी १५ आॅगस्ट राेजी लाल किल्ल्याहून दिलेल्या आपल्या भाषणात ही घाेषणा केली हाेती. देशातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पाेहाेचवण्याची याेजना असल्याचे त्यांनी जाहीर केले हाेते.आतापर्यंत या याेजनेतून सर्वात जास्त लाभ गुजरातमध्ये मिळाला आहे. आतापर्यंत गुजरातेत ६६ लाख २१ हजार ८२१ घरांपर्यंत नळाद्वारे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. ५३ लाख ८८ हजार ४२८ घरांना या याेजनेचा लाभ मिळाला. सर्व राज्यांतील घरांची संख्या वेगवेगळी आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशात नळ याेजनेची माेठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली जाते. काेराेनामुळे बेराेजगार झालेले कुशल व अकुशल श्रमिकांना याेजनेअंतर्गत ग्रामीण भागात राेजगार दिला जाईल. गेल्या २५ सप्टेंबरपर्यंत नळाद्वारे याेजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले हाेते. त्यानंतर ग्रामीण भागात जल समित्यांची स्थापना केली. त्यात ५० महिला सदस्य आहेत. प्रत्येक घरापर्यंत नळ याेजना पाेहाेचवली जात आहे का?, यावर निगराणीचे काम समित्या करतात.

शहरांसाठी मनरेगा, ‘न्याय’ याेजना लागू व्हावी : राहुल
काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मंगळवारी ट्विट करत सरकारला काही मुद्द्यांवर सल्ला दिला. शहरात बेराेजगारी असल्याने पीडित लाेकांसाठी मनरेगासारखी याेजना आणि देशभरातील गरिबांसाठी किमान उत्पन्न याेजना लागू करण्याची आवश्यकता आहे. या याेजना अर्थव्यवस्थेसाठी जास्त लाभदायी ठरतील, असे सांगून राहुल यांनी सरकारवर िनशाणा साधला. सूट-बूट घालून सरकार गरिबांच्या वेदना समजू शकेल? वास्तविक लाेकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने किमान उत्पन्न याेजना लागू करण्याचे आश्वासन दिले हाेते. सत्तेवर आल्यास काँग्रेस सरकार पाच काेटी गरीब कुटुंबांना दरवर्षी किमान ७२ हजार रुपये देईल, असे जाहीर करण्यात आले हाेते.

बातम्या आणखी आहेत...