आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाचा बट्ट्याबोळ:समोर भोजपुरी गाणे....अन् विद्यार्थी देत होते परीक्षा; मोबाईलवर पाहून पेपरमध्ये कॉपी, पाहा- VIDEO

नालंदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नालंदामधील 11वीच्या जीवशास्त्र परीक्षेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात परीक्षा हॉलमध्ये एलईडी टीव्हीवर भोजपुरी गाणे वाजत असून विद्यार्थी वर्गात बसून परीक्षा देत आहेत. व्हिडिओमध्ये विद्यार्थी मोबाईलमध्ये पाहून प्रश्नांची उत्तरे लिहित आहेत. तर वर्गात धिंगांना सुरू आहे. हे प्रकरण ​​​​​बौरिसराय गावातील उच्च माध्यमिक शाळेतील आहे.

या ठिकाणी सोमवारी बायलॉजीचा पेपर होता. शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी बिहार सरकारकडून स्मार्ट क्लास चालवला जात आहे. याअंतर्गत वर्ग खोल्यांमध्ये टीव्ही लावण्यात आले आहेत, मात्र नालंदामध्ये त्याचा गैरवापर होत आहे. तर यावरून बिहार राज्यातील शिक्षणातील बट्ट्याबोळ देखील चव्हाट्यावर आला आहे.

सर्वप्रथम जाणून घ्या - काय आहे व्हिडिओमध्ये...

परीक्षा हॉलमधील दोन व्हिडिओ समोर आले आहेत. पहिला व्हिडिओ 1 मिनिट 4 सेकंदाचा आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक OMR शीट समोर दाखवली आहे..त्यानंतर कॅमेरा समोरील LED TV वर पसरतो. यानंतर मुले हॉलमध्ये परीक्षा देताना दिसतात. दरम्यान, 'तोड़ा बदमाशी लिखल बा...' हे भोजपुरी गाणे वाजत आहे. तीन विद्यार्थी वर्गात एका बाकावर बसून परीक्षा देत आहेत. प्रत्येकजण एकमेकांची कॉपी घेऊन फसवणूक करत आहे. विद्यार्थ्यासमोर मोबाईलही ठेवला आहे.

विद्यार्थी अशाप्रकारे वर्गात बसून पेपर लिहत आहेत. तर त्यांची मस्ती देखील व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
विद्यार्थी अशाप्रकारे वर्गात बसून पेपर लिहत आहेत. तर त्यांची मस्ती देखील व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

दुसरा व्हिडिओ 44 सेकंदांचा आहे. त्यात पवन सिंगचे पियर फराक वाली हे गाणे वाजते आहे. काही मुले डेस्कवर बसून गाण्यांवर नाचताना तर काही मोबाईलमध्ये पाहून चिटींग करताना दिसले. यावेळी वर्ग खोलीचे दोन्ही दरवाजे बंद असतात. वर्गात एकही शिक्षक दिसत नाही.

एकमेकांची सेल्फी काढणे, मोबाईलमधून कॉपी करताना मुले दिसत आहेत.
एकमेकांची सेल्फी काढणे, मोबाईलमधून कॉपी करताना मुले दिसत आहेत.

डीईओ म्हणाले- व्हिडिओनंतर कारवाई

जिल्हा शिक्षण अधिकारी (डीईओ) केशव प्रसाद यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. इस्लामपूर गटाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. तपास अहवाल आल्यानंतरच कारवाई केली जाईल.

हे ही वाचा

पुणे पोलिसांची कारवाई : 50 हजारांत दहावीत बोगस अ‌ॅडमिशनसह प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 4 अटकेत

५० हजार रुपयांमध्ये इयत्ता दहावीचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि सांगली येथे ही टोळी कार्यरत असून पाचवी ते सातवीदरम्यान नापास झालेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता आयतेच दहावीचे बनावट प्रमाणपत्र देण्याचा हा गैरप्रकार पुणे पोलिस भरती प्रक्रियेवळी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात कळला. त्यानंतर सुमारे दोन-अडीच महिने तपास केला. पोलिसांनी पाचवी नापास एका तरुणाला डमी विद्यार्थी बनवून ५० हजारांत बनावट प्रमाणपत्र मिळवत या टोळीचा भंडाफोड केला. छत्रपती संभाजीनगरातून ३० आणि सांगलीतून ५ अशी एकूण ३५ बोगस प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली. - येथे वाचा संपूर्ण बातमी