आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Nalini Convicted Of Rajiv Gandhi's Assassination Attempts Suicide In Jail Nalini Is Serving Life Sentence In Vellore Jail In Tamil Nadu

राजीव गांधी हत्येतील दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न:28 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या नलिनीने जेलरसोबत झालेल्या वादानंतर केला आत्महत्येचा प्रयत्न

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नलिनी तामिळनाडूच्या वेल्लोर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
Advertisement
Advertisement

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिचे वकील पी.पुगाझेंडी यांच्या म्हणण्यानुसार, ज्या कैद्याशी नलिनीचे भांढण झाले त्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात यावे असे नलिनीचे म्हणणे होते. कारण त्या दोघांमध्ये गैरसमज आहे. सोमवारी रात्री नलिनीचा जेलरबरोबर वाद झाला. त्यानंतर नलिनीने तिचा गळा आवळून आत्महत्येचा प्रयत्न केला.

नलिनी 28 वर्षांपासून तुरूंगात आहे. तिच्या मुलीचा जन्मही तुरूंगातच झाला होता. यासह राजीव गांधी हत्याकांडातील अन्य सहा दोषीही तुरूंगात आहेत. यामध्ये नलिनी यांचे पती मुरुगन यांचाही समावेश आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूर येथे निवडणूक रॅली दरम्यान एलटीटीईच्या आत्मघातकी हल्ल्यात त्यांची हत्या झाली होती. या प्रकरणात नलिनीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु तामिळनाडू सरकारने तिची शिक्षा 24 एप्रिल 2000 रोजी जन्मठेपात बदलली.

Advertisement
0