आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Name Of The Female Player Came To The Fore For Helping Sushil Kumar In Sagar Rana Murder Case

सागर राना हत्या प्रकरण:सुशीलकुमारला मदत करणाऱ्यांमध्ये महिला खेळाडूचे नाव आले समोर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फ्लॅट भाड्याचा वाद पोलिसांना अमान्य

युवा पैलवान सागर रानाच्या हत्येच्या आरोपात अटक सुशील कुमारला मदत करणाऱ्यांमध्ये हँडबॉलच्या राष्ट्रीय महिला खेळाडूचे नाव समोर आले आहे. तिने दोन वेळा एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष सेलने जेव्हा या दोन्ही आरोपींना मुंडका भागातून पकडले तेव्हा ते या महिला खेळाडूच्या स्कूटरवर होते. पोलिसांनी स्कूटी ताब्यात घेतली आहे. आता ही महिला खेळाडू या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात आली आहे. दिल्ली आल्यानंतर सुशीलकुमार या महिला खेळाडूला दिल्ली कँट भागात भेटला. तेथून तो रविवारी सकाळी स्कूटी घेऊन निघालेला असतानाच गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

फ्लॅट भाड्याचा वाद पोलिसांना अमान्य
आतापर्यंतच्या चौकशीत सागरच्या मृत्यूचे कारण मॉडल टाऊनचा एक फ्लॅट सांगितला गेला. तो रिकामा केल्यानंतर दोन महिन्यांच्या भाड्यावरून वाद झाला होता. मात्र ही कथा गुन्हे शाखेला मान्य नाही. यामुळे दोन्ही आरोपींची चौकशी करून घटनेचे खरे कारण जाणून घेतले जात आहे. सागरसोबत त्याचा कधीपासून वाद होता हे सुशीलकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. सागर सुशीलला गुरू मानत असतानाही असे काय घडले की एवढी मोठी घटना घडली. छत्रसाल मैदानात घटनेच्या रात्री सुशीलसोबत कोण होते?

सोनू महालला संरक्षण
या प्रकरणात सोनू महाल आणि अमित पीडित तर आहेच, पण प्रत्यक्षदर्शीही आहे. त्याचा पुरावा न्यायालयात सुशीलकुमारला दोषी सिद्ध करण्यात महत्त्वाचा ठरेल. सोनूने सुशीलविरोधात जबाब दिला होता. यामुळे सुशील त्याच्यावर हल्ला करेल अशी सोनूला भीती होती. यामुळे त्याने दिल्ली पोलिसांकडून संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्याच्या सुरक्षेसाठी दोन पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...