आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत:नामिबियन चित्ता कुनोच्या जंगलातून गावात शिरला, पाहण्यासाठी लोक झाडांवर चढले, वन विभागाकडून बचावकार्य सुरू

श्योपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुनोतून पळून गेलेल्या चित्त्याचे नाव ओबान आहे. तो गावातील एका शेतात दिसून आला.  - Divya Marathi
कुनोतून पळून गेलेल्या चित्त्याचे नाव ओबान आहे. तो गावातील एका शेतात दिसून आला. 

कुनो नॅशनल पार्कमधून पळून गेलेला एक चित्ता रविवारी 20 किमी अंतरावरील एका गावातील शेतात दिसून आला. यामुळे गावकऱ्यांत दहशत पसरली आहे. अनेक गावकरी या चित्त्याला पाहण्यासाठी झाडांवर चढलेत.

या घटनेची माहिती मिळताच वन अमला व चित्ता मित्र घटनास्थळी पोहोचलेत. त्यांनी चित्त्याला पुन्हा जंगलाच्या दिशेने पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.

DFO प्रकाश वर्मा म्हणाले - नामिबियाहून आणण्यात आलेल्या चित्त्यांपैकी ओबान नामक चित्ता झार-बडौदा गावात शिरला. हे गाव कुनो नॅशनल पार्कपासून जवळपास 20 किमी अंतरावर आहे. मॉनिटरिंग टीम गावात पोहोचली आहे.

4 चित्त्यांना सोडण्यात आले होते जंगलात

चित्ता टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच ओबान, आशा, फ्रेंडी व एल्टन नामक चित्त्यांना पिंजऱ्यातून मोकळ्या जंगलात सोडले होते. तेव्हापासून हे चित्ते सातत्याने जंगलालगतच्या गावांत दिसून येत आहेत.

रविवारी दुपारी 12 च्या सुमारास ओबान चित्त्याचे मूव्हमेंट अगरा व झार-बडौदा भागात कुनो नॅशनल पार्कबाहेर दिसून आले. ग्रामस्थांच्या मते, हा चित्ता सकाळपासून त्यांच्या शेतात शिरला आहे. आम्हाला प्रथम वाटले तो बिबट्या आहे. पण नंतर तो चित्ता असल्याचे समजले.

चित्त्यांशी संबंधित खालील बातम्या वाचा...

वेदनादायी:PM मोदींनी बंदिवासात सोडलेल्या चित्त्याचा मृत्यू; नामिबियातून आणलेल्या 4 वर्षांच्या 'साशा'ला होता किडनीचा संसर्ग

17 सप्टेंबर रोजी कुनोला आणलेल्या आठ चित्तांपैकी एक, साशा या मादी चित्ताचा मृत्यू झाला.
17 सप्टेंबर रोजी कुनोला आणलेल्या आठ चित्तांपैकी एक, साशा या मादी चित्ताचा मृत्यू झाला.

कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या चित्त्यांपैकी एक 4 वर्षांची मादी चित्ता साशा मरण पावली आहे. ती किडनीच्या आजाराने त्रस्त होती. 17 सप्टेंबर रोजी नामिबियातून आठ चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांची मुक्तता करण्यात आली. यामध्ये साशाचाही समावेश होता. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांची आणखी एक तुकडी कुनो येथे आणण्यात आली. कुनो पार्कमध्येच महिला चित्ता साशाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. अंत्यसंस्कारही येथेच होणार आहेत.

सकाळी मृतदेह सापडला

वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जेएन कॉन्सोटिया यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी मादी बिबट्याचा मृतदेह सापडला, मात्र तिचा मृत्यू कधी झाला, हे सध्याच सांगता येणार नाही. भोपाळहून वन आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांचे पथक कुनो येथे पोहोचले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

कुनो राष्ट्रीय उद्यानातून आनंदाची बातमी:मादी चित्ता सियायाने चार बछडयांना दिला जन्म, पाहा VIDEO

मादी चित्ता साशाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी कुनो नॅशनल पार्कमधून आनंदाची बातमी आली आहे. येथे मादी चित्ता सियायाने चार बछडयांना जन्म दिला आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विट करून चित्ता प्रकल्प टीमचे अभिनंदन केले. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तीन मादी आणि दोन नर चित्ते उद्यानातील एका भागात सोडण्यात आली होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुनो नॅशनल पार्कच्या व्यवस्थापनाला 20 दिवसांपूर्वी मादी चित्ता सियायाच्या गर्भधारणेची माहिती मिळाली होती. तेव्हापासून तिला विशेष निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. येथे वाचा संपूर्ण बातमी...