आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nangre Patil Mahavikas Aghadi's Mafia, Nangre Patil's Involvement In Recovery Of Rs 100 Crore; Allegation Of Kirit Somaiya

आरोप:नांगरे पाटील महाविकास आघाडीचे माफिया, 100 कोटींच्या वसुलीत नांगरे पाटील यांचा सहभाग; किरीट सोमय्या यांचा आरोप

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीत सोमय्या म्हणाले, पाटील यांनी बेकायदेशीरपणे मला घरात कोंडून ठेवले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफिया आहेत, असा खळबळजनक आरोप केला.

शुक्रवारी दिल्लीत सोमय्या म्हणाले, पाटील यांनी बेकायदेशीरपणे मला घरात कोंडून ठेवले. परमबीर यांच्या १०० कोटींच्या वसुलीत ते सहभागी होते. नांगरे यांच्याविरुद्ध माझ्याकडे पुरावे आहेत. मला नजरकैदेत ठेवण्याचे आदेश नसल्याचे नांगरे पाटील यांना माहीत होते. तरी त्यांनी मुलुंड पोलिसांवर कारवाई केली नाही. नांगरे पाटलांना गृहमंत्री आदेश देत होते तर त्यांनी तसे सांगावे, असे आव्हान सोमय्यांनी दिले. भ्रष्टाचारावर कारवाईचे काम पोलिसांनी करायला हवे होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करायला हवे होते. पण यांनी अँटिकरप्शनलाच करप्ट केले, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...