आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narayan Sai Came Out Of Jail On Furlough After 7 Years, Got 14 Days Furlough Due To Poor Health Of His Mother

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आश्रमातील बलात्कार प्रकरण:7 वर्षांनंतर कारागृहातून बाहेर येतोय नारायण साई, आईची तब्येत बरी नसल्यामुळे मिळाली 14 दिवसांची फर्लो

सुरत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूरत आश्रमातील साध्वी दोन बहिणींनी साईविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती
  • 2002 ते 2004 दरम्यान साईने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याचा आरोप

लैंगिक शोषणाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूचा मुलगा नारायण साई फरलो मिळाल्यानंतर आज सुमारे 7 वर्षांनंतर तुरूंगातून बाहेर आला. सुरतच्या लाजपोर कारागृहातून बाहेर येताच पोलिस त्याला घेऊन अहमदाबादकडे रवाना झाले. आईची तब्येत बरी नसल्यामुळे गुजरात उच्च न्यायालयाने नारायण साईला 14 दिवसांचा फरलो मंजूर केला आहे.

कैदी आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाशी जोडलेला असावा पाहिजे ही बाब लक्षात घेत त्याला फरलो दिला जातो. नारायण साईने सुद्धा आई-वडिलांना भेटण्यासाठी 10 दिवसांचा जामीन देण्याची विनंती केली होती. सध्या साईच्या आईची प्रकृती बरी नाहीये आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे हृदय 40 टक्के काम करत आहे. या सर्व बाबी लक्षात घेत हायकोर्टाने साईच्या जामीन अर्जास मान्यता दिली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

2013 मध्ये सूरत आश्रमातील साध्वी असलेल्या दोन बहिणींनी साई विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. साईने 2002 ते 2004 दरम्यान कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप या बहिणींनी केला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर साई फरार झाला होता, त्याच्या एका महिन्यानंतर त्याला पंजाब-दिल्ली सीमेवर अटक केली होती. या प्रकरणात साईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser