आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा भागात सैन्यदल आणि पोलिसांनी नार्को-टेरर रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 65 कोटी रुपयांचे 13.5 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले. 2 पिस्टल आणि 4 ग्रेनेड देखील मिळाले आहे. या रॅकेटद्वारे दहशतवाद्यांना आर्थिक मदत आणि शस्त्रे पुरवली जात होती.
Kupwara Police & Army got huge success by arresting 02 #NarcoTerror#associates. Seized 13.5 Kg #narcotic substance worth of approx Rs 65 Cr. Besides 02 #pistols & 04 #grenades also recovered. Case registered. Investigation in progress. @JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 27, 2020
2 आठवड्यांपूर्वी 3 अतिरेकी मदतनीस पकडले होते
11 जून रोजी हंदवाडा पोलिसांनी देखील पाकिस्तानकडून सुरु असलेल्या नार्को-टेरर रॅकेटचा खुलासा करत अतिरेक्यांना 3 मदतनीसना अटक केली होती. त्यांच्याकडून 100 कोटी रुपयांचे 21 किलो हेरोइन आणि 1.34 कोटी रुपये रोख सापडले होते.हे लोक पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया करीत असलेल्या रॅकेटच्या संपर्कात होते. या रॅकेटच्या माध्यमातून लश्करच्या दहशतवाद्यांना आर्थिक मदत केली जात होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.