आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Mod UNGA Speech Today: | Full Text Of PM Narendra Modi United Nations General Assembly (UNGA) Speech

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूएनमध्ये मोदींचे भाषण:संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय प्रक्रियेपासून भारताला किती काळ दूर ठेवाल ? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी तिसऱ्यांदा संयुक्त राष्ट्र महासभा (यूएनजीए) च्या 75व्या बैठकीला संबोधित केले. यावेळी त्यांनी कोणत्याच देशाचे नाव न घेता म्हटले की, 'भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. जगातील 18% पेक्षा जास्त लोकसंख्या, शेकडो भाषा, अनेक पंथ, अनेक विचारधारा असलेला भारत देशाने शेकडो वर्षे जागतीक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व केले आणि शेकडो वर्षे गुलामीत काढले. जेव्हा आम्ही सामर्थ्यवान होतो, तेव्हा कोणाला त्रास दिला नाही आणि जेव्हा आम्ही दुबळे होते, तेव्हा कोणाची मदत घेतली नाही.'

मोदींनी आपल्या 22 मिनिटांच्या भाषणात संयुक्त राष्ट्रांच्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी कोविड-19 चा उल्लेख करत म्हटले की, भारत जगाला या महामारीतून बाहेर काढेल आणि व्हॅक्सीनच्या सर्वात मोठा उत्पादक देश बनले. तसेच, त्यांनी यावेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थाई सदस्यत्वावर बोलताना म्हटले की, भारताने किती काळ वाट पाहायची.

मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • सुरक्षा परिषदेचे प्रासंगिकता: मोदी म्हणाले- आजच्या काळापासून 1945 जग पूर्णपणे भिन्न होते. साधन, संसाधने सर्व भिन्न होते. अशा परिस्थितीत जागतिक कल्याणाच्या भावनेने स्थापन केलेली संस्थादेखील काळाप्रमाणे होती. आज आपण पूर्णपणे वेगळ्या टप्प्यात आहोत. एकविसाव्या शतकातील आपल्या सध्याच्या, भविष्यातील गरजा आणि आव्हाने वेगळी आहेत. आज, संपूर्ण जगासमोर हा एक मोठा प्रश्न आहे की ज्या परिस्थितीत स्थापना केली गेली ती संस्था आजही प्रासंगित आहे. जर सर्व बदल झाले आणि आपण बदलत नाही तर बदल आणण्याची शक्तीही कमकुवत होईल.
  • संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रयत्नांवर प्रश्नः जर तुम्ही संयुक्त राष्ट्रातील 75 वर्षातील कामगिरीचे मूल्यांकन केले तर बरेच यश आहेत. परंतु, अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात गंभीर आत्मनिरीक्षण आवश्यक आहेत. तिसरे महायुद्ध झाले नाही. परंतु बरेच युद्धे, गृहयुद्धे, दहशतवादी हल्ले झाले, जग हादरले, रक्ताच्या नद्या वाहिल्या.या हल्ल्यात ठार झालेले लोकही तुमच्या आमच्यारखेच होते. जगाभर नाव कमवण्याची स्वप्ने पाहणारी कोट्यावधी निरागस मुले जग सोडून गेली. किती लोकांना त्यांची आयुष्यभराची कमाई गमवावी लागली, त्यांना घर सोडावे लागले. अशात संयुक्त राष्ट्राचे प्रयत्न पुरेसे होते का ? कोरोनाशी जग 8-9 महिन्यांपासून संघर्ष करीत आहे. या साथीला सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे प्रभावी नेतृत्व कोठे होते?
  • यूएनच्या रिफॉर्मची प्रोसेस आणि भारताची भूमिका: संयुक्त राष्ट्र संघटना, प्रक्रिया बदल ही आज काळाची गरज आहे. यूएन सुधारणेसाठी सुरू असलेली प्रक्रिया पूर्ण होण्याची भारतीय प्रतीक्षा करत आहेत.संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय प्रक्रियेपासून भारताला किती काळ वेगळे ठेवले जाईल. जगातील सर्वात मोठी लोकशाही, जगातील 18 टक्के लोकसंख्या, शेकडो भाषा, अनेक पंथ, अनेक विचारधारा असलेला देश. शेकडो वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करणारे आणि शेकडो वर्षे गुलाम राहिलेला देश. जेव्हा आम्ही सामर्थ्यवान होतो तेव्हा कोणाचा छळ केला नव्हता, आणी दुबळे झाल्यावर कोणावर अवलंबून राहिलो नाहीत.
  • भारत संयुक्त राष्ट्रातील आपली भूमिका पाहत आहे: संयुक्त राष्ट्र संघाने जे आदर्श निर्माण केले ते भारताशी मिळते जुळते आहेत. या सभागृहात हा शब्द अनेकदा प्रतिध्वनी झाला की वसुधैव कुटुंबकम्. आम्ही संपूर्ण जगाला कुटुंब मानतो. हा आपल्या संस्कृतीचा, आणि विचारांचा एक भाग आहे. जागतिक कल्याणास भारताने नेहमीच प्राधान्य दिले आहे. आम्ही आमच्या लोकांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी 50 पीस कीपिंग मिशनवर पाठविले. शांतता प्रस्थापित करताना आम्ही आपले सर्वात पराक्रमी सैनिक गमावले. आज प्रत्येक भारतीय आपले योगदान, संयुक्त राष्ट्रामधील भूमिका पहात आहे.
  • भारत कायमस्वरुपी सदस्य म्हणून काम करेलः पुढील वर्षी जानेवारीपासून भारत देखील सुरक्षा परिषदेचा कायमस्वरुपी सदस्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडेल. आम्ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याची प्रतिष्ठा आणि त्याचा अनुभव जागतिक हितासाठी वापरू. आमचा मार्ग जनकल्यान ते जगकल्याण आहे. शांतता, सुरक्षा आणि समृद्धीसाठी भारताचा आवाज नेहमीच उठत असतो.
  • महामारीच्या काळात सर्वांची मदत केली: भारताच्या औषध उद्योगाने साथीच्या कठीण काळातही 150 देशांना औषधे पाठवली आहेत. आज मला सर्वांना आणखी एक आश्वासन द्यायचे आहे की भारताची लस उत्पादन आणि वितरण क्षमता मानवतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरेल. आम्ही भारतात आणि आमच्या आसपास क्लिनिकल चाचण्या वाढवत आहोत. लसी वितरणासाठी कोल्ड चेन आणि साठवण क्षमता वाढविण्यात भारत सर्वांना मदत करेल.
बातम्या आणखी आहेत...