आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएनमध्ये मोदींचे संबोधन:'कोरोनाविरोधातील लढाईला आम्ही जन आंदोलन बनवले, 150 देशांची मदत केली'- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी संयुक्त राष्ट्र (यूएन) ला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, यावर्षी आपण संयुक्त राष्ट्रांचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला. भारत 50 फाउंडर मेंबर्सपैकी आहे, जे दुसऱ्या महायुद्धानंतर एकत्र आले होते. आज यूएन ने 193 देशांना जोडले आहे. यासोबतच यूएनकडून आपेक्षाही वाढल्या आहेत.

मोदी पुढे म्हणाले- भारताने यूएनच्या कामात आपले योगदान दिले. आज आपण 2030 चा एजेंडा आणि टिकाऊ विकासाच्या उद्दीष्टांमध्ये योगदान देत आहोत. जगातील लोकसंख्येच्या सहाव्या भागात भारत आहे. आम्ही आमच्या जबाबदाऱ्या ओळखून आहोत. आम्हाला माहित आहे की जर भारताने आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य केली तर जगाच्या उद्दीष्टांची पूर्तता करता येईल.

'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास'

पंतप्रधान पुढे म्हणाले की, आमची घोषणा आहे की, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास. मागच्या वर्षी आम्ही गांधींची 150वी जयंती साजरी केली. आम्ही 6 हजार गावांमध्ये स्वच्छतेचे लक्ष्य पूर्ण केले. आम्ही 10 कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये टॉयलेट बांधले. आमच्या 7 कोटी ग्रामीण महिला सेल्फ हेल्प ग्रुपचा भाग आहेत. या आयुष्याला बदलत आहेत. आमच्या लोकल गवर्नमेंटमध्ये 10 लाखांपेक्षा ज्यास्त महिला प्रतिनिधित्व करत आहेत. 6 वर्षात आम्ही 40 कोटी बँक अकाउंट उघडले.

मोदींनी पुढे सांगितले की, विकासाच्या मार्गावर जाण्याबरोबरच आपण निसर्गाप्रती असलेली आपली जबाबदारी विसरली नाही. आम्ही कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी पाऊले उचलली. 450 गीगावाट रिन्युएबल एनर्जी प्रोड्यूस करण्याचे ध्येय ठेवले आहे. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करण्यसाठी मोठे अभियान छेडले.

ते म्हणाले की, भूकंप, वादळ, इबोला किंवा कोणतीही मानवी-समस्या किंवा नैसर्गिक समस्या, भारताने नेहमीच इतरांना मदत केली. कोरोनाबद्दल बोलायचे झाले तर, आम्ही 150 देशांना मदत केली. आम्ही सार्क कोव्हिड फंडची स्थापना केली. कोव्हिडच्या वेळी आम्ही सरकारच्या प्रयत्नांना जनतेशी जोडले आणि कोरोनाविरूद्धच्या युद्धाला सार्वजनिक मोहीम बनविली.

संयुक्त राष्ट्रांच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित

पंतप्रधानांचे भाषण संयुक्त राष्ट्रांच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. यावर्षी जूनमध्ये भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) चा तात्पुरता सदस्य म्हणून निवडला गेला. यानंतर मोदी अशा कार्यक्रमात बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बातम्या आणखी आहेत...