आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Address Nation Today Live |PM Modi Will Address The Nation At 4 Pm Today News And Updates

पंतप्रधानांचे देशाला संबोधन:नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना दरमहा 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि 1 किलो हरभरा मोफत देण्यात येईल : मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरपंच किंवा पंतप्रधान कोणीही नियमांपेक्षा मोठा नाही - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी आज कोरोना काळात देशाला सहाव्यांदा संबोधित केले. यावेळी मोदींनी गरीब कुटुंबासाठी महत्वपूर्ण घोषणा केली. कोरोना काळात सुरू करण्यात आलेली गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळी आणि छठ म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. याअंतर्गत, गरीब कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकार 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ मोफत देईल. यासह प्रत्येक कुटुंबाला दरमहा एक किलो दाळ देखील मोफत देण्यात येणार आहे.

अनलॉकमध्ये निष्काळजीपणा वाढतोय 

मोदी म्हणाले की, जगाच्या तुलनेत कोरोनाच्या बाबतीत भारत स्थिर स्थितीत आहे, परंतु अनलॉकमध्ये निष्काळजीपणा वाढत आहे. लॉकडाउन प्रमाणेच लोकांनी दक्षता दर्शविली पाहिजे. नियम न पाळणाऱ्यांना समजावणे आवश्यक आहे. 

कंटेनमेंट झोनकडे बरेच लक्ष देणे आवश्यक 

पंतप्रधान म्हणाले की आपण 6 फुटांचे अंतर, वीस सेकंदाच्या हात धुण्याबाबत काळजी घेतली आहे. आज जेव्हा आपल्याला अधिक सतर्कतेची आवश्यकता आहे, तेव्हा वाढती लापरवाही मोठे चिंतेचे कारण आहे. लॉकडाउनमध्ये नियमांचे गंभीरपणे पालन करण्यात आले. आता स्थानिक नागरिक संस्था, देशातील नागरिकांना सरकारांनी तीच दक्षता दाखवण्याची गरज आहे. कंटेनमेंट झोनकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नियम न पाळणाऱ्यांना समजावणे आवश्यक आहे. 

सरपंच किंवा पंतप्रधान कोणीही नियमांपेक्षा मोठा नाही

पंतप्रधान म्हणाले की, एका देशाच्या पंतप्रधानांना मास्क न घातल्याप्रकरणी 13 हजाराचा दंड ठोठावण्यात आला अशी बातमी आपण वाचली किंवा पाहिली असेल. भारतातही स्थानिक प्रशासनाने अशाप्रकारे काम केले पाहिजे. ही 130 भारतीयांच्या सुरक्षेची मोहीम आहे. गाव प्रमुख किंवा देशाचे पंतप्रधान, कोणीही नियमांपेक्षा मोठा नाही.

3 महिन्यांत 20 कोटी जन-धन खात्यांमध्ये 31 हजार कोटी रुपये जमा 

लॉकडाऊनमध्ये गोरगरीबांच्या घरात चूल पेटणार नाही अशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न झाला. अशा मोठ्या देशात गरीब बंधू-भगिनींनी भुकेले राहू नये यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाने प्रयत्न केला. देश असो किंवा व्यक्ती, वेळ आणि संवेदनशीलतेने निर्णय घेतल्यास कोणत्याही समस्येचा सामना करण्याची शक्ती अनेक पटीने वाढते. लॉकडाउन होताच सरकारने गरीब कल्याण योजना आणली. त्याअंतर्गत 1.75 दशलक्ष रुपयांचे पॅकेज देण्यात आले. 3 महिन्यांत 20 कोटी जन धन खात्यात 31 हजार कोटी जमा झाले आहेत. 9 कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. यासोबतच खेड्यांतील कामगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान जलद गतीने सुरू करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींचे कोरोना काळात आत्तापर्यंत केलेले संबोधन 

  • पहिले संबोधन - 19 मार्च: जनता कर्फ्यूची घोषणा
  • दुसरे संबोधन - 24 मार्च: 21 दिवसांचा लॉकडाउन
  • तिसरे संबोधन - 3 एप्रिल: दिप प्रज्वलीत करण्याचे आवाहन
  • चौथे संबोधन - 14 एप्रिल : लॉकडाउन-2 ची घोषणा
  • पाचवे संबोधन - 12 मे : 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची आणि लॉकडाउन 4.0 का घोषणा