आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Addresses People Over Corona Situation In India , News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचा संदेश:लॉकडाऊन अंतिम पर्याय असावा, 30 एप्रिलला घेणार मोठे निर्णय; बंगाल आणि उप्रमध्ये पंचायत निवडणुकीनंतर नवी रणनीती

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जो त्रास तुम्हाला होत आहे, त्याची मला पूर्ण जाणीव आहे; ज्यांनी आपला जवळचा व्यक्ती गमावलाय, त्यांच्या दुःखात सामील आहे

काेरोनावर मात करताना अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून केंद्र ३० एप्रिलनंतर मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प. बंगाल विधानसभा व उप्र पंचायत निवडणुका २९ रोजी संपत आहेत. यानंतर तत्काळ निर्णय लागू होऊ शकतात. गेल्या लॉकडाऊनचा अनुभव पाहता यासाठी नवीन मॉडेल तयार केले जात आहे. ४० कोटी लोकांना लसीचे कवच देऊन वाहतुकीचे निर्णय मंत्रालये घेतील. २९ एप्रिलपासूनच याची अंमलबजावणी होऊ शकते.

अनलॉक-२ च्या मॉडेलवर अंमलबजावणीची शक्यता
सूत्रांनुसार, गेल्या वर्षी २९ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉक-२ च्या मॉडेलची पुन्हा अंमलबजावणी होऊ शकते. त्यात अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू राहण्यासाठी आवश्यक बाबी कठोर दिशानिर्देशांसह सुरू करण्यात आल्या होत्या. सर्व अनावश्यक बाबींवर निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. या मोहिमेची जबाबदारी एका टास्क फोर्सकडे सोपवली जाऊ शकते.

शाळा-कॉलेज, थिएटर बंद राहण्याची शक्यता
{शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास ऑनलाइन सुरू राहू शकतील. {सिनेमा हॉल, जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर,बार, बंद राहतील. {सामाजिक, राजकीय आयोजनांवर बंदी राहू शकते.

रात्रीचा कोरोना कर्फ्यू देशभर लागू होऊ शकतो
केंद्र सरकार रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत देशभरात कोरोना कर्फ्यू लावू शकते, पण आवश्यक गोष्टींना सूट राहील. रेल्वे, बस, विमानाने, कारखान्यांतून परतणाऱ्यांना घरी जाण्यासाठी ऑटो-टॅक्सी सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना स्थितीच्या संदर्भाने संवाद साधला. ते म्हणाले, लॉकडाऊन अंतिम पर्याय असायला हवा.
वाचा संवादातील ४ मुख्य मुद्दे...
1.
राज्यांना आवाहन... देशाला लॉकडाऊनपासून देशातील नागरिकांनी मिळून वाचवायचे आहे. आता कंटेनमेंट नव्हे, मायक्रो कंटेनमेंट झोन करून देश वाचवायचा आहे.
2. कामगारांना आवाहन... तुम्ही सध्या जेथे आहात तेथेच थांबा. राज्य सोडू नका. या कामगारांचा रोजगार थांबणार नाही याची राज्यांनी त्यांना हमी द्यावी. या सर्वांना येथेच लस दिली जाईल.
3. युवकांना... आपल्या घरी, शेजारी टास्क फोर्स म्हणून काम करा. कोविड प्रोटोकॉल पाळण्यासाठी कुटुंबाला सातत्याने आठवण करून द्या.
4. राम आणि रमजान... मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा संदेश आहे की, आपण मर्यादांचे पालन करायला हवे. रमजान सुरू आहे, यातून संयम राखण्याची शिकवण मिळते.

लक्ष्य : लसीकरण आणि अर्थव्यवस्था सावरावी
पद्धत : गावात गर्दीची ठिकाणे नियंत्रित करणे
ध्येय : साखळी तोडून या संसर्गावर नियंत्रण

बातम्या आणखी आहेत...