आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Afghanistan | PM Narendra Modi Cabinet Committee Meeting On Afghanistan Kabul Situation

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरुन मोदींची बैठक:पंतप्रधान म्हणाले - काबुलमधून भारतीयांना आणण्याचे नियोजन करा, भारताकडून अपेक्षा ठेवणाऱ्या अफगाणच्या बांधवांचीही मदत करा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमित शहा, राजनाथ आणि अजित डोभालही सामील झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांच्या ताब्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक घेतली आहे. ही समिती राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबी पाहणारी सर्वात मोठी सरकारी संस्था आहे. बैठकीदरम्यान, पंतप्रधानांनी अफगाणिस्तान प्रकरणांशी संबंधित अधिकाऱ्यांना येत्या काळात अफगाणिस्तानातून भारतीयांच्या सुरक्षित परताव्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान म्हणाले की भारताने केवळ आपल्या लोकांचे रक्षण केले पाहिजे असे नाही, तर आपण शीख आणि हिंदू अल्पसंख्यांकांना आश्रय दिला पाहिजे जे भारतात येऊ इच्छितात. आपण आपल्या अफगाणिस्तानच्या बंधू -भगिनींनाही शक्य ती मदत करायला हवी, जे यासाठी भारताकडे अपेक्षा लावून बसले आहेत.

अमित शहा, राजनाथ आणि अजित डोभालही सामील झाले
गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या बैठकीला उपस्थित होते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देशाबाहेर असल्याने चर्चेला उपस्थित राहिले नाहीत.

अफगाणिस्तानमधील भारताचे राजदूत रुद्रेंद्र टंडनही या बैठकीला उपस्थित होते. टंडन मंगळवारीच काबूलहून भारतात परतले आहेत. वरिष्ठ सरकारी सूत्रांनी सांगितले की, समितीला अफगाणिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती आणि राजकीय परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली.

भारत काबूलमधून आपले लोक आणत आहे
अफगाणिस्तानमधील वाढते तणाव आणि बिघडलेली सुरक्षा परिस्थिती पाहता भारताने दोन लष्करी वाहतूक विमाने पाठवली होती. काबूलच्या दूतावासातून भारतीय राजदूत आणि सर्व कर्मचाऱ्यांना परत आणण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानाने मंगळवारी काबूलमधून भारतीय मुत्सद्दी अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि काही अडकलेल्या भारतीयांसह सुमारे 150 लोकांना आणले.

सोमवारी दुसऱ्या विमानाने सुमारे 40 कामगारांना काबूलमधून बाहेर काढण्यात आले. मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सध्या सरकारचे प्राधान्य म्हणजे अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांची संपूर्ण माहिती गोळा करणे.

बातम्या आणखी आहेत...