आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi All Party Meet Update | India China Ladakh Border Situation News | PM Modi All Party Meeting Latest News Updates On Galwan Valley Face Off Today; Amit Shah, Defence Minister Rajnath Singh, Mamata Banerjee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक:मोदी म्हणाले- आम्ही जवानांना पूर्ण सूट दिली आहे, देशाची एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे म्हणाले- भारत 'मजबूत' आहे 'मजबूर' नाही, डोळे काढून हातात द्या यांचे
  • संवेदनशील प्रकरणांचा आदर करायला हवा- शरद पवार

चीनसोबतचा तणाव आणि गलवानमध्ये झालेल्या हिंसक मारामारीत 20 जवान शहीद झाल्याच्या मुद्द्यावर शुक्रवारी(ता.19)पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत 20 पक्ष सहभागी झाले आहेत. बैठकीच्या सुरुवातीला सर्वांनी गलवानमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, बसपा अध्यक्ष मायावती, तृणमूल अध्यक्ष ममता बनर्जीदेखील उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीसाठी आरजेडी आणि आम आदमी पार्टीला बोलवण्यात आले नाही.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही आमच्या लष्कराला संपूर्ण सूट दिली आहे. आपल्या एक इंचही जमिनीवर कोणी डोळा टाकू शकत नाही. आपल्या सीमेत कोणीच घुसखोरी केली नाही, आणि आपल्या एकाही चौकीवर चीनी सैनिकांनी कब्जा केला नाही. आपले 20 जवान शहीद झाले. जवानांना ज्यांनी आव्हाण दिले, त्यांना जवानांनी उत्तर दिले. त्यांच्या विरतेला देश कायम लक्षात ठेवेल. त्यांच्या जाण्याने सर्वजण दुखी आहेत.

शिवसेना अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चीनी सैनिकांच्या भ्याड हल्ल्यावर कडक शब्दात टीका केली. यावेळी ते म्हणाले की, भारताला शांती हवी आहे, पण याचा अर्थ असा नाही की, आपण कमकुवत आहोत. विश्वासघात करणे, हे चीनची सवय आहे. भारत मजबूत आहे, मजबूर नाही. आपल्या सरकार दुबळी नाही, डोळे काढून हातात द्या यांचे. यादरम्यान काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी सरकारला तीन प्रश्न विचारले. त्यांनी इंटेलीजेंस रिपोर्ट आणि सॅटेलाइट इमेजबाबत मोदींकडे माहिती मागितली.

सोनिया गांधीचे तीन प्रश्न

1. ही बैठक फार पूर्वीच व्हायला हवी होती. अद्यापही अनेक गोष्टी अंधारात आहेत. चीनच्या सैनिकांनी घुसखोरी कधी केली आणि सरकारला कधी कळाले, हे मोदी सरकारने सांगावे ?

2. सरकारकडे सॅटेलाइट इमेज नव्हती ? चीनच्या या खुरापतींबाबत इंटेलीजेंस रिपोर्ट मिळाली नव्हती का ?

3. माउंटेन स्ट्राइक कोरची सध्याची परिस्थिती काय आहे ? देशाला विश्वास द्या की, सीमेवर पूर्वीप्रमाणे परिस्थिती होईल. विरोधी पक्षांना याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात यावी.

या पक्षांनी सरकारला पाठींबा दिला

1. तृणमूल अध्यक्ष ममता बनर्जी म्हणाल्या की, सर्व पक्षीय बैठक देशासाठी चांगला संदेश आहे. यातून हे सिद्ध होते की, आपण आपल्या जवानांसोबत एकजुटीने आहोत. तृणमूल सरकारच्या बाजुने आहे. टेलीकॉम, रेल्वे आणि एविएशनमध्ये चीनला हस्तक्षेप करून देणार नाही. आपल्याला काही समस्या येतील. पण, आम्ही चीनींना घुसखोरी करू देणार नाहीत. चीनमध्ये लोकशाही नाही. चीनविरोधात आपण एकजुटीने सोबत आहोत. भारताचा विजय होईल.

2. जनता दल यूनाइटेडचे अध्यक्ष नीतीश कुमार म्हणाले की, संपूर्ण देशात चीनविरोधात राग आहे. यादरम्यान आपापसात कोणतेच मतभेद व्हायला नको. आपल्यातील मतभेद विसरुन जा, नाहीतर इतर देश याचा फायदा घेतली. भारतासोबत चीनने काय केले, हे 1962 मध्येच सर्वांनी पाहिले आहे. भारतीय बाजारात चीनी वस्तूंची संख्या खूप आहे. आपल्याला एकत्र येऊन केंद्राला सपोर्ट करायचा आहे.

3. समाजवादी पार्टीचे नेते राम गोपाल यादव म्हणाले की, पाकिस्तान आणि चीनचे चारित्र्य चांगले नाही. भारत चीनचा डंपिंग ग्राउंड नाहीये. चीनच्या सामानांवर भारताने 300% कस्टम ड्यूटी लावायला हवी.

4. टीआरएस चीफ आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, काश्मीरमध्ये विकासाच्या पंतप्रधानांच्या एजेंड्यामुळे चीन नाराज आहे. सरकारचा आत्मनिर्भरतेचा नारादेखील चीनला त्रासदायक ठरत आहे. यामुळेच चीन अशा कुरापती करत आहे.

7. डीएमके नेते एमके स्टालिन म्हणाले- देशावर संकट आल्यावर आम्ही सर्व एक आहोत. पंतप्रधानांनी चीनच्या मुद्द्यावर दिलेल्या विधानाचे आम्ही स्वागत करतो.

8. एनपीपीच्या कोनराड संगमा म्हणाले की, सीमेवर इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचे काम थांबायला नको. म्यांमार आणि बांग्लादेशमध्ये चीन कुरापती करत आहे. उत्तर-पूर्वमधील इंन्फ्रास्ट्रक्चरचे काम थांबायला नको.

9. बीजद नेते पिनाकी मिश्रा म्हणाले, चीनने इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. परत एकदा त्यांनी अंधारात सैनिकांवर हल्ला केला. 

10. वायएसआर काँग्रेसचे चीफ आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले- पंतप्रधनांनी जगभरात भारताचे पाऊल पुढे नेले आहे. पंतप्रधान तुम्ही आमची शक्ती आहात. 

संवेदनशील प्रकरणांचा आदर करायला हवा- शरद पवार

सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग म्हणाले की, आम्हाला पंतप्रधानांवर संपूर्ण विश्वास आहे. देशाच्या सुरक्षेखातर त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. माजी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, सैनिकांनी शस्त्र चालवावे का नाही, याचा निर्णय आंतरराष्ट्री कारारानुसार होतो आणि आपल्याला अशा संवेधनशील प्रकरणांचा आदर करायला हवा.

चार क्रायटेरियांच्या आधारे पक्षांना निमंत्रण

एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनुसार, 4 क्रायटेरियाच्या आधारे ऑल पार्टी मीटिंगसाठी इनविटेशन देण्यात आले आहे. पहिला- सर्व राष्ट्रीय पक्ष. दुसरा- ज्या पक्षांचे लोकसभेत 5 खासदार आहेत. तिसरा- नॉर्थ-इस्टमधील प्रमुख पक्ष आणि चौथा- ज्या पक्षांचे नेते केंद्रीय कॅबिनेटमध्ये सामील आहेत. या आधारांवर 20 पक्षांना सामील करण्यात आले आहे.

आरजेडीने विचारले क्रायटेरिया काय आहे?

आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी ट्वीट करुन विचारले की, आरजेडीचे 5 खासदार असूनही पक्षाने सर्वपक्षीय बैठकीत बोलवले का नाही ? अखेर क्रायटेरिया काय आहे ?

आम आदमी पार्टी (आप) चे नेते संजय सिंह म्हणाले की, केंद्रात एक वेगळाच अहंकार असलेली सरकार बसलेली आहे. महत्वाच्या विषयावर भाजपला आपचे मत नकोय.

मागील 2 सर्व पक्षीय बैठकीत राजनाथ सिंह होते अध्यक्ष

देशाच्या सीमासुरक्षेच्या मुद्द्यावर 6 वर्षात ही तिसरी सर्व पक्षीय बैठक आहे. मागच्या वर्षी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 16 फेब्रुवारी 2019 ला सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. यापूर्वी पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक झाल्यानंतर 29 सप्टेंबर 2016 ला झाली होती. या दोन्ही बैठकींचेय अध्यक्ष तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह होते. 

मोदी म्हणाले- आम्हाला शांती हवीये, पण उत्तर देण्यास सक्षम

सोमवारी(ता 15) लद्दाखच्या गलवान घाटीत चीनच्या सैनिकांच्या हल्ल्यात, भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यात चीनचेही 40 सैनिक शहीद झाले, पण चीन कबुल करत नाहीये. या घटनेच्या दोन दिवसानंतर 17 जूनला मोदी म्हणाले होते की, "आम्हाला शांती हवीये, पण कोणी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही उत्तर देण्यास सक्षम आहोत. आम्हाला आमच्या शहीद जवानांवर गर्व आहे. आमच्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही."

बातम्या आणखी आहेत...