आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi And Lata Mangeshkar Special Bonding Like Brother Sister Type Mumbai

मोदींनी शेअर केल्या लतादीदींसोबतच्या आठवणी:म्हणाले- मी पंतप्रधान व्हावे अशी दीदींनी व्यक्त केली होती इच्छा; रक्षाबंधनाला दरवर्षी पाठवायच्या राखी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अ‍ॅपवर ब्लॉगद्वारे लता मंगेशकर यांच्यासोबतच्या त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी आपल्या गाण्याने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या जाण्याने संगीतातील एका युगाचा अंत झाला. मोदी म्हणाले की, लतादीदी मला भाऊ मानत होत्या आणि आज आमच्या लतादीदी आम्हाला सोडून गेल्या.

पंतप्रधान आणि लतादीदी यांच्यात भावा-बहिणीचे नाते होते. लतादीदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला पंतप्रधान कधीच विसरत नव्हते. त्याचबरोबर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर लतादीदी दरवर्षी रक्षाबंधनाला त्यांना राखी पाठवत होत्या. पीएम मोदी म्हणाले की, मी जेव्हाही त्यांना भेटायचो तेव्हा मला त्यांच्या घरी गुजराती जेवण खायला मिळायचे.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी लतादीदींनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी लतादीदींनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

मी प्रार्थना करते की तुम्ही भारताचे पंतप्रधान व्हा..
2013 मध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी, लतादीदींनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या होत्या. त्या क्षणांची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, कार्यक्रमादरम्यान लता दीदी म्हणाल्या होत्या की, मी प्रार्थना करते की तुम्ही भारताचे पंतप्रधान व्हा. या कार्यक्रमात लतादीदींनी मला पहिल्यांदा नरेंद्रभाई म्हणून संबोधित केले होते, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

वाढदिवसानिमित्त संभाषणाच्या ऑडिओचा संदर्भ
पंतप्रधान मोदींनी लतादीदींच्या 90व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी झालेल्या संभाषणाचा ऑडिओ शेअर केला होता. यामध्ये पंतप्रधानांशी संवाद साधताना लता दीदी म्हणाल्या की, मला देशाच्या बदलत्या चित्राचा आनंद मिळतो. असेच काम करत राहा. या ऑडिओमध्ये लतादीदी पंतप्रधानांच्या आईकडून आशीर्वाद घेण्याबाबत बोलत आहेत.

चित्रपटसृष्टीत आठ दशकांचे योगदान
आठ दशके चित्रपट उद्योगात संगीताच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या लता दीदी यांना 2001 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला. याशिवाय लतादीदींना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके सन्मानही मिळाला आहे. लता दीदी यांना ‘लेकिन’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...