आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज असाम आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. सध्या ते असाममध्ये आहेत. त्यांनी सोनितपुरमधील एका रॅलीत बोलताना म्हटले की, देशातील सुर्योदय पुर्वोत्तरपासूनच होतो. पण, विकासाच्या सुर्योदसाठी पुर्वोत्तरला खुप वाट पाहावी लागली. सोनितपुरच्या ढेकियाजुलीमध्ये मोदींनी असाम माला हायवे प्रोजेक्टची सुरुवात केली. बिश्वनाथ आणि चराइदेवमध्ये एक मेडिकल कॉलेज आणि एका रुग्णलयाचे भूमिपूजन केले.
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
हिंसा आणि तनाव दूर करुन असाम विकास करत आहे
शहीदांच्या शौर्याचा साक्षीदार ही सोनितपुरची जमीन आहे. असामचा इतिहास माझी छाती गौरवाने भरतो. हिंसा, भेदभाव, तनाव, पक्षपात, संघर्षसारख्या गोष्टींना दूर करुन नॉर्थ-ईस्ट विकासच्या मार्गावर पुढे जात आहे.
दुर्गम भागात रुग्णालये बांधली जात आहेत
असामच्या दुर्गम भागात रुग्णालये बांधली जात आहेत. यापुर्वी रुग्णालय म्हणजे, अनेक तासांचा प्रवास आणि निराशा होती. कोणती मेडिकल इमरजंसी येऊ नये, अशी चिंता येथील लोकांना असायची. आता या समस्या दूर दोत आहेत, तुम्ही हा फरक पाहू शकता.
2016 पर्यंत असाममध्ये फक्त 6 मेडिकल कॉलेज होते
मागील 5 वर्षात असाममध्ये 6 मेडिकल कॉलेज आणि रुग्णालये बांधण्याचे काम सुरू झाले आहे. निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यावर आश्वास देतो की, असाममध्येही एक मेडिकल कॉलेज आणि एक टेक्निकल कॉलेज स्थानीक भाषेत सुरू होणार. गुवाहाटीमध्येही एम्स असेल.
यापुर्वी 23 जानेवारीला कोलकातामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात मोदी गेले होते. बंगालच्या हल्दियामध्ये होणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. पण, मुख्यमंत्र्यांची त्या कार्यक्रमात जाण्याची शक्यता कमी आहे.
23 जानेवारीला नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीवर कोलकाताच्या विक्टोरिया मेमोरियलमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकाच मंचावर आले होते. यावेळी भाजप समर्थकांनी यज श्री राम अशा घोषणा दिल्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत भाषण न देताच निघून गेल्या होत्या.
पंतप्रधानांचा आजचा कार्यक्रम
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.