आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Assam University Update | PM Modi Virtually Address Convocation Of Tezpur University In Assam Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय संघाच्या विजयाचे मोदींकडून कौतुक:पंतप्रधान म्हणाले - 'काही खेळाडूंचा अनुभव कमी पण आत्मविश्वास दृढ होता, त्यांनी इतिहास रचला'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये देशाचा स्वभाव दाखवला'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसामच्या तेजपूर यूनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून संबोधित केले. या दरम्यान पंतप्रधानांनी अचानक क्रिकेटविषयी बोलून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

मोदी म्हणाले, 'ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या काही खेळाडूंना अनुभव कमी होता, मात्र त्यांचा आत्मविश्वास दृढ होता. संधी मिळाली तर त्यांनी इतिहास रचला.' त्यांनी भारतीय संघाट्या विजयातून तीन शिकवण घेण्याचा सल्ला दिला -

  1. आपल्या क्षमतांवर विश्वास असायला हवा. जर तुम्ही असे केले तर अवघड कामही सोपे होईल.
  2. पॉझिटिव्ह विचारांनी पुढे जा. यामुळे सर्व कामे पॉझिटिव्ह होतील.
  3. जर सुरक्षितपणे बाहेर पडून जोरदार विजय मिळवायचा पर्याय असेल तर आपण विजयाकडे वाटचाल केली पाहिजे. या प्रयत्नात काही वेळा पराभवाचा सामना करावा लागतो. पण आपण घाबरू नये. जर आपण अतिरिक्त दबाव घेतला तर आपण चुकतो.

'भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये देशाचा स्वभाव दाखवला'
पंतप्रधान म्हणाले - प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी देशाची मनस्थिती बदलली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलिया टूरमध्ये देशाचा स्वभाव पाहायला मिळाला. पहिला सामना पराभूत झाला, परंतु नंतर तरुण खेळाडूंनी आव्हानाचा सामना करत नवीन निराकरण केले.

बातम्या आणखी आहेत...