आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपुरात 520 किमी लांबीच्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. येथे ढोलवादनाने नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोदींनी स्वतः ढोल वाजवणाऱ्यांत जाऊन ढोलवादनाचा आनंद घेतला.
पीएम नरेंद्र मोदी यांनी मेट्रो सेवेचीही सुरुवात केली. मेट्रो स्थानकाच्या उद्घाटनानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मेट्रोचा प्रवास केला. या प्रवासात विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तत्पूर्वी त्यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रवाना केला. ही देशाची 6वी वंदे भारत रेल्वे आहे. ती नागपूर-रायपूर दरम्यान धावेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचले. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. मोदींनी महाराष्ट्रात 75 हजार कोटींच्या प्रकल्पांची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी AIIMS नागपूरचे उद्घाटनही केले. येथूनच मोदी गोव्याला जावून तेथील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करतील.
520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन
मुंबई-नागपूर एक्सप्रेस-वेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या 6 पदरी एक्सप्रेसवेला समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. पीएम मोदींनी नागपूर व शिर्डीला जोडणाऱ्या 520 किमी लांबीच्या या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्गाटन केले. हा महामार्ग उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील 10 जिल्ह्यातून जाईल.
विविध प्रकल्पांची पायाभरणी
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात आज एका जाहीर कार्यक्रमात 1500 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील. यावेळी मोदी जनतेला संबोधित करतील. याशिवाय पंतप्रधान मोदी राष्ट्रीय वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नागपूर आणि नागपुरातील नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणीही करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी चंद्रपूर येथील केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्थेचं उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर 'हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र, चंद्रपूर'चे लोकार्पण करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.