आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातवांगमधील भारत-चीनच्या सैनिकांतील चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच ईशान्य भारताच्या दौऱ्यावर पोहोचलेत. ते नॉर्थ ईस्टर्न काउंसिलच्या (NEC) 50 व्या वर्धापन दिनानिमित्त शिलाँगमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी ते या भागातील पारंपरिक पेहरावात दिसून आले.
शिलाँगमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले - फुटबॉलमध्ये कुणी खेळाडू वृत्ती दाखवली नाही तर त्याला रेड कार्ड दाखवून बाहेर केले जाते. त्याच धर्तीवर आम्ही मागील 8 वर्षांत नॉर्थ ईस्टच्या विकासाला मारक ठरणाऱ्या अनेक गोष्टींना रेड कार्ड दाखवले. सरकार भ्रष्टाचार, भेदभाव, घराणेशाही, हिंसाचार, प्रकल्पांत अडथळे निर्माण करणे व मतपेटीचे राजकारण हद्दपार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण या आजाराची मुळे खूप खोल असतात हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून हे वाईट मुळासकट उखडून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत.
'देशाचे पहिल स्पोर्ट्स विद्यापीठात नॉर्थ ईस्टमध्ये'
PM म्हणाले - आज आपण कतार फीफा वर्ल्डकपमध्ये जगभरातील संघ खेळताना पाहत आहोत. पण मला देशाच्या तरुणांवर विश्वास आहे. त्यामुळे आपण भारतातही असा प्रारचा उत्सव साजरा करून तिरग्यांचा जयजयकार करू असा मला ठाम विश्वास आहे. क्रीडा क्षेत्रासंबंधी सरकार समग्र दृष्टिकोन घेऊन वाटचाल करत आहे. याचा लाभ ईशान्येतील तरुणांना होत आहे. देशाचे पहिले क्रीडा विद्यापीठ ईशान्य भारतात आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले - आम्ही केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमात बदल केला. त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण देशात दिसून येत आहे. यंदा केंद्र केवळ पायाभूत सोईसुविधांवर 7 लाख कोटींचा खर्च करत आहे. 8 वर्षांपूर्वी हा खर्च 2 लाख कोटींहून कमी होता. स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतर आपल्याला केवळ 2 लाख कोटींपर्यंत पोहोचता आले. कनेक्टिव्हिटीचा उल्लेख करत मोदी म्हणाले - डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे केवळ चर्चा व संवादच चांगला होत नाही, तर यामुळे पर्यटनापासून तंत्रज्ञानापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, सर्वच क्षेत्रांतील सुविधांत वाढ होते, संधी वाढतात.
मेघालयचे CM म्हणाले - मोदींच्या नेतृत्वात नॉर्थ ईस्टचा विकास
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा म्हणाले - पूर्वी आमच्या राज्यासाठी केवळ 500 कोटींचा निधी वितरित होत होता. आज हा आकडा 1500 कोटींवर पोहोचला आहे. याचा थेट लाभ गावांना मिळत आहे. मला विश्वास आहे की, एक दिवस संपूर्ण नॉर्थ ईस्ट मोदींच्या नेतृत्वात आपला विकास साधेल.
शहा म्हणाले - पीएम मोदींचे 50 हून अधिक दौरे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनईसीची बैठक पार पडली. मोदींनी केवळ एनईसीच्या कार्याचेच कौतुक केले नाही, तर संपूर्ण क्षेत्राच्या विकासाचा रोडमॅपही तयार केला आहे. आता दर 15 दिवसांना एक मंत्री नॉर्थ ईस्टचा दौरा करतो. विशेषतः पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर स्वतः मोदींनीही या क्षेत्राचा 50 हून अधिकवेळा दौरा केला आहे.
शहा म्हणाले - पूर्वी संपूर्ण ईशान्य भारत शटडाऊन, उपोषण, बॉम्बस्फोट व गोळीबारासाठी ओळखला जात होता. विविध संघटनांचे अतिरेकी ईशान्येतील जनतेला प्रभावित करत होते. याचा फटका स्थानिक पर्यटन व उद्योगांना बसत होता. गत 8 वर्षांत अशा घटनांत तब्बल 74 टक्क्यांची घट झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांतही 60 टक्क्यांची घट झाली. नागरिकांच्या मृत्यूशी संबंधित घटनांतही 89 टक्के घट झाली असून, जवळपास 8 हजार तरुणांनी आत्मसमर्पण केले आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे यश आहे.
मेघालयमधून AFSPA हद्दपार - शहा
गृहमंत्री अमित शहा म्हणाले- मागील 8 वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ईशान्य भारत शांतता व विकासाच्या मार्गाने वाटचाल करत आहे. यापूर्वी या भागासाठी बजेट वाटप होत होते. पण ते लागू होत नव्हते. मोदी सत्तेत आल्यानंतर अनेक बदलांसह बजेट आज थेट गावांपर्यंत पोहोचते. हे एक मोठे यश आहे.
आज आसामचे 60% क्षेत्र AFSPA मुक्त आहे. मणिपूरच्या 6 जिल्ह्यांतील 15 पोलिस ठाण्याच्या हद्दीही अफ्स्पा मुक्त आहेत. अरुणाचल प्रदेशातील केवळ एक जिल्हा या कायद्याच्या अखत्यारीत आहे. नागालँडच्या 7 जिल्ह्यांतून हा कायदा हद्दपार करण्यात आला आहे. त्रिपुरा व मेघालयमधूनही AFSPA पूर्णपणे मागे घेण्यात आला आहे. मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण ईशान्य बारत विकासाच्या मार्गावर अग्रेसर झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.