आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी केली अटलजींची बरोबरी:सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावर राहणारे बिगर काँग्रेसी नेते बनले नरेंद्र मोदी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान म्हणून मोदींचा आज 2,272 वा दिवस आहे, उद्या मोदी अटलजींचा रेकॉर्ड मोडतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील दोन दिवसात दोन रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांचा आज 2,272 वा दिवस आहे. मागील 6 वर्षे दोन महीने 19 दिवसांपासून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आहेत. अटल बिहारी वाजपेटीदेखील आपल्या कार्यकाळात इतक्या दिवस पंतप्रधान पदावर होते. म्हणजेच, मोदींनी आज अटलजींच्या रेकॉर्डची बरोबरी केली आणि उद्या त्यांचा रेकॉर्ड मोडतील. दुसरा रेकॉर्ड 15 ऑगस्टला लालकिल्यावर बनले. जेव्हा मोदी 7 व्यांदा तिरंगा फडकवून अटलजींच्या पुढे जातील.

जवाहरलाल नेहरू सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावर होते

पंतप्रधान पदावर मोदींपेक्षा तिघांचा कार्यकाळ जास्त राहिला आहे. यात जवाहर लाल नेहरू, इंदिरा गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग. तिन्ही नेते काँग्रेसचे होते. सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा रेकॉर्ड भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावे आहे. नेहरू 16 वर्षे 9 महीने आणि 12 दिवस पंतप्रधान होते.

इंदिरा गांधी आणि मनमोहनदेखील मोदींच्या पुढे

सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा रेकॉर्ड नेहरूनंतर त्यांची मुलगी इंदिरा गांधींच्या नावे आहे. इंदिरा गांधी एकूण 15 वर्षे 11 महीने 17 दिवस पंतप्रधान होत्या.तिसऱ्या नंबरवर मनमोहन सिंग आहेत. मनमोहन सिंग सलग 10 वर्षे पंतप्रधान होते.

बातम्या आणखी आहेत...